आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक आता ‘नेक्स्ट गोल्ड सिटी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- दशकापूर्वी नाशिक शहरात सराफ बाजारात गादीवर बसून चालणारे सराफी पेढय़ांतील व्यवहार आता दिमाखदार एअरकंडीशन्ड सराफी दालनांतून सुरू झाले आहेत. नाशिकमध्ये अनेक नामांकित सराफी पेढय़ा दाखल झाल्या असून, त्यात पुढील वर्षभरात अजून 15 नामांकित पेढय़ा दाखल होणार असल्याने ‘नेक्स्ट गोल्ड सिटी’ अशी नाशिकची नवी ओळख निर्माण होत आहे.

नाशिकचे आकर्षण अनेक नामांकित पेढय़ांना आवरता आलेले नसून, शहरात यापूर्वीच पी.एन.जी., तनिष्क, आर. सी. बाफणा ज्वेलर्स, राजमल लखीचंद ज्वेलर्स, रिलायन्स ज्वेल्स यांसारख्या बाहेरील सराफी पेढय़ा व्यवसाय करीत आहेत.

वाढत्या स्पर्धेत परंपरागत चालत आलेला आपला ग्राहक टिकावा, याकरिता अनेक पेढय़ांनी कॉर्पोरेट चेहरा स्वीकारला आहे. शहरातील शरणपूररोड, कॅनडा कॉर्नर, कॉलेजरोडच्या परिसरात मोठय़ा संख्येने सराफी पेढय़ा उभ्या राहिल्या आहेत. या रस्त्यांवरच आज बाफना ज्वेलर्स, सुराणा ज्वेल्स, पु. ना. गाडगीळ, रिलायन्स ज्वेल्स, टकले जेम्स अँण्ड ज्वेलरी, बाफनाज डायमंड गॅलॅक्सी, तनिष्क (म. नगर), सुवर्णनक्षत्र, केएनजे ज्वेलर्स यांसारख्या, तर नाशिकरोडला गोविंद दंडे अँण्ड सन्स व दंडे अँण्ड सन्स यांसारख्या सराफी पेढय़ा ग्राहकांना सेवा देत आहेत.

बाहेरील पेढय़ांना आकर्षण
शहराबद्दल बाहेरील पेढय़ांना प्रचंड आकर्षण असल्यानेच कॉर्पोरेट आणि इतरही पेढय़ा शहरात येत आहेत. वर्षभरात यात किमान 15 पेढय़ांची वाढ होण्याची शक्यता आहे. नीलेश बाफना, संचालक, बाफना ज्वेलर्स प्रा. लिमिटेड

शहराच्या क्षमतांमुळे आकर्षण
येथील व परिसरातील जमिनीचे वाढणारे भाव आणि भरभराटीचा शेती व्यवसाय यामुळे शहराची क्रयशक्ती मोठी आहे. सध्या बाजारातील ट्रेण्ड आणि मागणीही बदलत असल्याने ‘त्रिशा’ हे नवे दालन सुरू केले आहे. हर्षल नाईक, व्यवस्थापकीय संचालक, मिरजकर सराफ प्रा.लि.

शहरातच मनपसंत दागिने
वेगाने विकसित होणारे शहर म्हणून नाशिकची ओळख असून, व्यावसायिकांचे लक्ष नाशिककडे आहे. मुंबई-पुण्याला खरेदीला जाणार्‍यांना शहरातच पारदर्शकता आणि गुणवत्तापूर्ण दागिने मिळत असल्याने ग्राहक समाधानी आहेत. आशेष बागुल, संचालक, तनिष्क, शरणपूररोड

सहा महिन्यांत विस्तारही
सराफ बाजारातील जुन्या मिरजकर सराफ जेम्स प्रायव्हेट लिमिटेडने ‘त्रिशा’, तर मयूर अलंकारचेही नवे दालन गंगापूररोडवर सुरू झाल्याने नाशिककरांचे लक्ष वेधले आहे. तर राजीव गांधी भवनजवळ ‘तनिष्क’चे आणि कॅनडा कॉर्नरजवळ ‘रिलायन्स ज्वेल्स’चेदेखील नवे दालन सुरू आहे.

ग्राहकांत समाधान
एअरकंडीशन्ड वातावरण, सोने, चांदी व हिरे अलंकारांच्या हजारो डिझाइन्स, हव्या त्या डिझाइनचे अलंकार बनवून देण्याची तयारी, विनयशील कर्मचारी यामुळे ग्राहकांना उत्तम सेवा मिळत असल्याने ग्राहक समाधानी आहेत.