आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक नेक्स्ट अायटी डेस्टिनेशनचे सादरीकरण, मांडल्या जाणार शहराच्या क्षमता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - मुंबईत१३ फेब्रुवारीपासून सुरू हाेत असलेल्या ‘मेक इन इंडिया वीक’मध्ये नाशिक नेक्स्ट अायटी डेस्टिनेशनच्या सादरीकरणासाठी प्रयत्न सुरू झाले अाहेत. यासाठी शहरातील अायटी उद्याेगांच्या प्रतिनिधींची एक प्राथमिक बैठक निमातर्फे शनिवारी (दि. २३) दुपारी वाजता होणार असल्याची माहिती इन्स्टिट्यूट अाॅफ इंजिनिअर्स, लाेकल सेंटरचे अध्यक्ष मनीष कोठारी यांनी दिली. शहरात अायटी उद्याेग यावेत, यासाठी बैठकीत शहराच्या क्षमतांचे दर्शन एका विशेष सादरीकरणातून देश-विदेशातील उद्याेजकांपुढे केले जाणार अाहे.

‘मेक इन इंडिया’ हा केंद्राचा देशव्यापी पहिलाच उपक्रम असून, महाराष्ट्राला त्याचे यजमानपद मिळाले अाहे. ६० देशांतील उद्याेजकांचा यात सहभाग असल्याने राज्यात गुंतवणूक यावी, यासाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ हे विशेष चर्चासत्र ‘मेक इन इंडिया वीक’मध्ये हाेणार अाहे. त्यातच ‘नाशिक नेक्स्ट अायटी डेस्टिनेशन’ म्हणून प्रमाेशन केले जावे, अशी शहरातील अायटीयन्सची इच्छा अाहे. सीअायअायसमवेत एमअायडीसीने घेतलेल्या राेड शाेद्वारे माेठ्या संख्येने सहभागी हाेण्याचे अावाहन मात्र सरकारकडून उद्याेजकांना नुकतेच करण्यात अाले. मेक इन इंडियाच्या संकेतस्थळावर लाॅग इन करून या वीकमध्ये सहभागी हाेता येणार असल्याचे एमअायडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप जाधव यांनी या कार्यक्रमात स्पष्ट केले अाहे.

तीनवर्षांपासून मागणीकडे सतत दुर्लक्ष
अायटीउद्याेगांकडून विस्तारीकरणाकरिता टियर टू शहरांना पसंती दिली जात अाहे. नाशिकमध्येही या उद्योगांसाठी मुबलक सुविधा उपलब्ध असून, किमान लहान-माेठ्या दाेनशेवर कंपन्या तूर्तास कार्यरत अाहेत. दाेन महिन्यांत नाशिक विमानतळ सुरू हाेत असून, देशातील इतर शहरांकरिता नाशिकचे अंतर काही तासांवर येऊन ठेपणार अाहे. यामुळे नाशिक हे एक उत्तम अायटी शहर म्हणून अाकाराला येऊ शकते.