आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - हॉटेल ज्युपिटरजवळ पार्क केलेल्या मर्सिडीज कारमधून अज्ञात चोरट्यांनी 9 लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना सोमवारी दुपारी 4.30 वाजता घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत आनंदवली येथील दुर्गेश रेसडन्सी येथे राहणार्या काव्या अमित सिंग यांनी फिर्याद दिली आहे. काव्या सिंग ह्या दुपारी आपल्या मर्सिडीजमधून (एमएच15 बीके 3000) पंचवटी कारंजावरील महाराष्ट्र स्टील येथे गेल्या होत्या. तेथून भांडे घेवून त्या ज्युपीटर हॉटेलजवळ आल्या. याच दरम्यान गाडीच्या सीटवर ठेवलेल्या एका पर्समध्ये 8 लाख 60 हजार तर दुसर्या पर्समध्ये 15 हजार तसेच चार मोबाईल हॅन्डसेटही चोरून नेण्यात आले.
सराफी दुकान फोडले
हिरावाडी परिसरात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास एक सोनाराचे सराफी दुकाण फोडून सुमारे 1 लाखाच्या ऐवजाची चोरी केली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पंचवटी पोलिस ठाण्यात याबाबत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिरावाडी परिसरात प्रसन्न ज्वेलर्स या सोन्याचांदीच्या दुकाणाचे शटर वेल्डींगच्या साह्याने कापून दुकानातील 30 हजार रूपये किमंतीचे चांदीचे दागीने, 10 हजार रुपयांचे सोन्याचे दागीने आणि काही नवग्रहाचे खडे व रोकड असा सुमारे एक लाखाचा ऐवज चोरीस गेला.
सोमवारी सकाळी नागरीकांनी दुकान मालक सचिन रामचंद्र विसपुते यांना दुकानात चोरी झाल्याबाबत कळवले. विसपुते यांनी केलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवस्तीतील दुकान फोडून चोरी झाल्याने सराइत टोळीने ही घरफोडी केली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.