आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकेतस्थळावरून अखेर जकात हद्दपार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘महापालिकेत अजूनही जकात कायम’ या आशयाचे वृत्त ‘दिव्य मराठी’त प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेच्या संगणक विभागाने दुसर्‍याच दिवशी महापालिकेच्या संकेतस्थळावरून जकातीला हद्दपार करत तेथे एलबीटीचा उल्लेख केला.

राज्य शासनाने एलबीटी लागू करून सर्वच महापालिकांमध्ये जकातीला कायमचा रामराम ठोकला. नाशिक महापालिकेत एलबीटीला विरोध म्हणून जवळपास 15 दिवस संप, निदर्शने, आंदोलने झाली. मात्र, एलबीटीला थांबवता आले नाही. महापालिकेला 70 ते 75 टक्के उत्पन्न जकातीच्या माध्यमातून मिळत होते. त्यावरच महापालिकेचा कोट्यवधींच्या खर्चाचा डोलारा अवलंबून होता. त्यामुळे एलबीटीतून एवढे उत्पन्न मिळेल की नाही या चिंतेतूनच महापालिकेतील लोकप्रतिनिधींचादेखील एलबीटीला विरोध होता. शहरातून जकात हटली तरी महापालिकेच्या संकेतस्थळावर शनिवारपर्यंत ती झळकत होती.