आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिवृत्त मिळत नसल्याने नाराजी; घंटागाडी योजनेचा ठराव स्थायी समितीसमोर सादर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतरही अनेक विषय तरतुदीनुसार दिलेल्या कालावधीत स्थायीसमोर सादर होत नाहीत. मागील अनेक सभांचे इतिवृत्त अद्याप मंजूर केले जात नसल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली असून, चार महिन्यांपासून तहकूब घंटागाडीचा ठराव सोमवारच्या स्थायीसमोर सादर करण्यात आला.

महाराष्ष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आल्यानंतर गोदाघाट सुशोभिकरण, गोदापार्क, रिंगरोड, शहरातील अंतर्गत रस्ते, पेव्हरब्लॉक, वृक्षलागवड, आकर्षक वाहतूक बेटे इ. उपक्रम हाती घेण्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतर अद्यापपर्यंत या बाबींची दखल घेण्यात आली नाही. उलट शहरातील फाळके स्मारक, तारांगण, खतप्रकल्प, मोकाट श्वाननिर्बीजीकरण, घंटागाडी, पेस्ट कंट्रोल यासह इतरही योजनांचे खासगीकरण करण्याचे निर्णय झाले आहेत. मागील पंचवार्षिकमधील अनेक वादग्रस्त विषयांचे इतिवृत्तही देण्यात आले नसून, मनसेच्या काळातील इतिवृत्ताला विलंब केला जात असल्याचा आरोप होत आहे. आयुक्तांच्या अधिकारातील अनेक विषय मंजुरीनंतरही अद्याप स्थायी समितीसमोर येत नसल्याने त्याविषयी नगरसेवकांमधून शंका उपस्थित केली जात आहे. वास्तविक असे विषय मंजुरीनंतर पंधरा दिवसांत समितीसमोर येणे गरजेचे असते.

जकात विभागासाठी खासगी वाहने नेमली होती. मात्र त्याची माहिती अद्याप स्थायीला सादर करण्यात आलेली नाही. मागील वर्षाच्या अर्थसंकल्पाची देखील अद्याप पुर्णत: अंमलबजावणी झालेली नसल्याने महासभेचा अवमानप्रकरणी प्रशासनावर हक्कभंग प्रस्ताव येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.