आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महासभेचा ‘अाखाडा’, नगरसेवकांचा मानापमान मुद्दा; भाजप पालकमंत्र्यांवर हल्लाबाेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कुंभमेळ्याच्या ध्वजाराेहणप्रसंगी महापाैरांसह नगरसेवकांच्या झालेल्या अवमानाचा जाब विचारण्यासाठी महासभेत लक्षवेधीद्वारे चर्चा सुरू झाल्यानंतर, संतप्त नगरसेवकांनी भाजपच्या नगरसेवकांबराेबरच पालकमंत्र्यांनाही लक्ष्य केले. तब्बल साडेतीन तासांच्या चर्चेत पुराेहित संघाच्या भाजपप्रेमाचे वाभाडे काढतानाच महापाैरांचा म्हणजे समस्त नाशिककरांचा अपमान झाल्याची भावना व्यक्त करीत, अागामी पर्वणीकाळात नगरसेवकांबराेबरच समाजातील प्रतिष्ठांचा अवमान टाळण्यासाठी स्पेशल पासेसची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात अाली त्यास महापाैरांनी अनुमाेदन देत तशी व्यवस्था महापालिकेमार्फत करण्याचे अाश्वासन िदले.
मनसे नगरसेवक सुदाम काेंबडे यांनी पुराेहित संघाला लक्ष्य करणारी लक्षवेधी मांडली हाेती. नगरसेवकांचा पुराेहित संघाकडून जाणीवपूर्वक अपमान झाला. त्यासाठी भाजपची मदत हाेती. वस्त्रांतरगृहाचा धार्मिक कारणास्तव दुरुपयाेग हाेत असून, महापालिकेने तातडीने वास्तू ताब्यात घ्यावी, अशीही मागणी केली. दरम्यान, विलास शिंदे, संदीप लेनकर, तानाजी जायभावे, राहुल दिवे, शिवाजी गांगुर्डे, याेगिता अाहेर यांनी पाेलिसांच्या कार्यपद्धतीवर अाराेप करीत पालिकेकडून नियाेजनात चूक झाल्याकडे लक्ष वेधले. महापाैरांबराेबरच ध्वजाराेहण साेहळ्यासाठी अालेल्या कुटुंबीयांचा अपमान केल्याच्या मुद्यावरून महिला नगरसेविका अाक्रमक झाल्या. रत्नमाला राणे, सुरेखा भाेसले, मेघा साळवे, याेगिता अाहेर, शाेभा अावारे, विराेधी पक्षनेत्या कविता कर्डक, सुवर्णा मटालेे, अनिता थाेरात, रंजना पवार, ललिता भालेराव, उषा शेळके यांच्यासह अनेक महिला नगरसेवकांनी प्रशासनालाच जाब विचारला.
एकमेकांवरचिखलफेक : ध्वजाराेहणसाेहळ्यातील मानापमानाची समीक्षा करताना नगरसेवकांकडून एकमेकांवर चिखलफेक झाली. एवढा अाटापिटा ज्या सन्मानासाठी करीत अाहाेत, त्यात अापलाच अवमान कसा करून घेत अाहाेत, याचीही जाणीव राहिली नाही. संदीप लेनकर यांनी थेट पालकमंत्र्यांवर अाराेप करून दाैरे करून, हातात दगड घेऊन फाेटाे काढून सिंहस्थाचे नियाेजन केले असा अर्थ हाेत नसल्याचा टाेला लावला.

शिवसेनेचा ठाकरी बाणा...
शिवसेनागटनेते अजय बाेरस्ते यांनी नगरसेवकांना सन्मान िमळविण्यासाठी लक्षवेधी मांडावी लागते ही बाब दुर्दैवी असून, मुळात शिवसेना मनसेचे कार्यकर्ते ठाकरे यांचे अनुयायी असल्यामुळे सन्मान कसा मिळवायचा अवमान करणाऱ्यांना कसा धडा शिकवायचा, हे अापल्याला चांगले माहीत असल्याने उगाच निष्फळ चर्चेवर वेळ वाया घालवून अापलेच वाभाडे काढू नका, असाही टाेला लावला. वेळेवर अालेले टिकाेजीराव अापल्याला काेण शिकवणार, असा चिमटा त्यांनी पालकमंत्र्यांसह भाजप नेत्यांना अप्रत्यक्षपणे काढला. सुधाकर बडगुजर यांनी पालिका अधिकारी नगरसेवकांचा अवमान हाेताना काेठे हाेते, असा सवाल केला.
बातम्या आणखी आहेत...