आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालिकेचे दुर्लक्ष : डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटल रुग्णशय्येवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुने नाशिक - कथडा येथील मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रुग्णालयातील यंत्रसामग्री खराब झाली आहे. सोनोग्राफी यंत्र नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. अस्वच्छतेने परिसीमा गाठली आहे. रुग्ण बरे होणार्‍या वातावरणाऐवजी रोगट वातावरण आहे.

हॉस्पिटलमध्ये कित्येक दिवसांपासून एक्स-रे मशीनची प्रिंट चांगली येत नाही. भिंतीवर पान व गुटखा खाऊन पिचकार्‍या मारल्याने कोपरे अस्वच्छ झाले आहेत. पावसाळ्यात छते ओघळू लागतात. शस्त्रक्रियेलाही मोठी अडचण येते. तीन लिफ्टपैकी दोन बंद आहेत. या ठिकाणी बीपीएल कार्डधारकांना थेट सवलत दिली जात नाही. त्यांची फाइल वर पाठवल्यानंतर ती मंजूर झाल्यावरच त्यांना लाभ मिळतो. पिण्याच्या पाण्याच्या टाकीची दुरवस्था झाली असून, पाण्याअभावी रुग्णांसह कर्मचार्‍यांचे हाल होत आहेत.
कर्मचार्‍यांअभावी स्वच्छता करता येत नाही, रुग्णांकडे लक्ष देण्यास अडचण येते. सुरक्षारक्षक नसल्याने नेहमी चोरीचे प्रकार घडतात. अशा समस्या असल्यामुळे मनपाच्या सदर रुग्णालयाला बुस्टर डोस देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.

एकूण वॉर्डांपैकी किती सुरू
हॉस्पिटलमध्ये 4 वॉर्ड आहेत. जनरल वॉर्डात 16 खाटा आहेत. पुरुष वॉर्डात 25 खाटा, तर स्वाइन फ्लूच्या वॉर्डात 16 खाटा आहेत. प्रसूती वॉर्डात 25 खाटा आहेत. नवजात शिशु, बालकक्ष, स्त्री कक्ष बंद आहेत.