आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे रुग्णालये झाली आजारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सर्वत्र धूळ, अस्वच्छता, तोटके कर्मचारी, साधनांचा अभाव अशा असंख्य समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या कथडा येथील महापालिकेच्या डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयाची दारुण अवस्था पाहता हे रुग्णालय आहे की एखादे जुनाट सरकारी कार्यालय असे जाणवते. ही परिस्थिती पाहता पालिका प्रशासनाबरोबरच नगरसेवकांनाही देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे.

डॉ. जाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये जाताच हॉस्पिटलच्या भिंतीवरील रंग विविध ठिकाणी निघाल्यामुळे हॉस्पिटल हे विद्रूप झाल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी भिंतीवर पान व गुटखा खाऊन थुंकल्याने कोपरे अस्वच्छ असल्याचे दिसत आहे. पावसाळ्यात छतातून पाणी गळती होते. 100 बेडचे हॉस्पिटलमध्ये एकही सोनोग्राफी यंत्र तपासणी नाही ही शोकांतिका ही दिसून आली.

प्रसूतीगृहाची दुरवस्था अस्वच्छता जुने नाशिक येथे महापालिका प्रशासनाने गोरगरिबांसाठी महापालिकाचे मुलतानपुरा प्रसूतीगृह व जिजामाता प्रसूतीगृहच आता आजारी पडले आहे. या प्रसूतीगृहामध्ये जाताच भिंतीवरील रंग विविध ठिकाणी निघाल्याने विद्रूप झाले आहे. अनेक ठिकाणी भिंतीवर पान व खुटखा खाऊन थुंकल्याने कोपरे अस्वच्छ असल्याचे दिसत आहे. पावसाळ्यात छतातून गळती होते. मुलतान प्रसूतीगृहात एकूण 12 बेड दिल्या आहेत, त्यापैकी फक्त 9 बेड वापरण्यासारखे आहे तसेच जिजामातामध्ये 25 बेडपैकी अनेकांची स्थिती वाईट झाली आहे.

मेनरोडच्या जिजामाता प्रसूतीगृहाजवळ दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. परिसरात अस्वच्छता झाली आहे. औषधोपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांसह परिचारिका आणि डॉक्टरांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. मुलतानपुरा प्रसूतीगृहाच्या शेजारी नागरिक केरकचरा आणून टाकतात. साफसफाई होत नसल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णांचेच आरोग्य धोक्यात सापडले आहे.

या आहेत समस्या
1) रुग्णालयात 3 लिफ्टपैकी 2 लिफ्ट बंद आहेत.

2) बीपीएल कार्डधारकांना थेट सवलत दिली जात नाही. त्यांची फाइलवर पाठविल्यानंतर ती मंजूर झाल्यावरच लाभ मिळतो .

3) औषधे ही एक्सपायरी डेटनंतरची आढळून आली. त्याच प्रमाणे औषधांचा स्टोअररूमची दुर्दशा झालेली आढळून आली.

4) कर्मचारी, रुग्णांसाठी तसेच त्यांचे नातेवाइकांसाठी बसविलेली टाकीत पाणीच नसल्याने सर्वांचे हाल होत आहे. पाण्याची गंभीर समस्या हॉस्पिटलमध्ये आहे.

5) अपुरा कर्मचारी वर्गामुळे अडचण.