आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik NMC Standing Committee Election On 20 April

स्थायी सभापती निवडीचा मुहूर्त निश्चित; 20 एप्रिलला निवडणूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी 20 एप्रिलला निवडणूक होत आहे. याच दिवशी तिजोरीच्या चाव्या शिवसेनेच्या पाठिंब्यावर मनसे मिळवेल की महाआघाडीचा फॉर्म्युला कायम ठेवत शिवसेना मनसेला शह देईल, याचा फैसला होणार आहे.
पालिकेची सत्ता मिळाल्यानंतर काँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेना व अपक्षांच्या महाआघाडीमुळे स्थायी सभापतिपदाचे इंजिन मनसेच्या गाडीला जुळू शकले नाही. परिणामी, महापौर मनसेचा मात्र आर्थिक तिजोरी असलेल्या स्थायीच्या चाव्या काँग्रेसकडे गेल्याचे चित्र निर्माण झाले होते. मनसेला धोरणात्मक निर्णय घेण्यातही त्यामुळे अडचणी येत होत्या. दरम्यानच्या काळात महाआघाडीत झालेली बिघाडी व प्रभाग निवडणुकीत सेनेशी सोयरीक यामुळे मनसेच्या सभापतिपद मिळवण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. निवडणुकीसाठी 18 एप्रिलला सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असेल. 20 एप्रिलला सकाळी 11 वाजता महसूल आयुक्तालयातील अप्पर आयुक्त टी. के. बागुल यांच्या उपस्थितीत सभापतींची निवड होणार आहे.