आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला म्हणून दुय्यम स्थान; नगरसेविका नंदिनी जाधव यांना सभागृहातच रडू कोसळले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर - नगरसेविका नंदिनी जाधव व माजी सभापती सचिन भोर यांच्यात प्रभागातील कामांबाबत झालेल्या चर्चेतून वाद झाल्याने नगरसेविका नंदिनी जाधव यांना सभागृहातच रडू कोसळले, तर मागील सभेत सभापतींना लेखी निवेदन देऊनही अतिक्रमणाबाबत निर्णय न घेतल्याने संतप्त झालेल्या पाटील दांपत्याने सभात्याग केला.

सातपूर प्रभाग सभा सोमवारी वादातच पार पडली. सभापती विलास शिंदे यांनी अधिकार्‍यांना कामे करण्याचे आदेश देतानाच कोट्यवधींच्या कामांना मंजुरी दिली. नगरसेविका नंदिनी जाधव म्हणाल्या, मी महिला नगरसेविका असल्याने मला दुय्यम स्थान दिले जाते. अधिकारी नगरसेवकांच्या गाडीत फिरतात, असा आरोप त्यांनी केल्याने सचिन भोर हे संतप्त होऊन त्यांच्यात वाद झाला.

सुनीता कोठुळेंनी प्रशासनास धरले धारेवर

पहिल्याच पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीस नगरसेवकांनी प्रशासनास जबाबदार धरून धारेवर धरले. प्रभाग समितीची सभा सभापती सुनीता कोठुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

पावसाळ्यात रस्ता डांबरीकरण व कॉँक्रिटीकरण केले जात नसताना सभेने विभागातील प्रभाग 32 मधील समाजमंदिराभोवती कॉँक्रिटीकरणास 1,98,431 रुपये, प्रभाग 36 रस्ता रुंदीकरण व कॉँक्रिटीकरणासाठी 1,98,145, 1,98,052 रुपये, प्रभाग 61 रस्ता खडीकरण, कॉँक्रिटीकरणासाठी 1,98,016 रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली.

प्रभाग 35 गटारी सफाईसाठी 1 लाख 5 हजार 108, प्रभाग 34 विविध नाले सफाईसाठी 1,99, 767, 1,79,822 व 1,98,986, प्रभाग 57 गटारी साफसफाईसाठी 1,58,132, प्रभाग 58 साठी 1,98, 366, प्रभाग 55 साठी 1,97,581, 81, 241 प्रभाग 59 साईडपट्टय़ा सफाईसाठी 1,97,298, प्रभाग 60 नाला, गटारी सफाईसाठी 1,97,218 रुपये, प्रभाग 61 साठी 1,98,546 रुपये, प्रभाग 57 साठी 1,98,031, 1,98,155 रुपये, प्रभाग 58 नाला सफाईसाठी 1,99,871 रुपये, प्रभाग 61 स्लमच्या सफाईसाठी 1,94, 560, प्रभाग 36 साठी 1,98,154 रुपयांच्या कामांना मंजुरी दिली.