आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्ते खेळताना पकडलेले पालिकेचे 7 कर्मचारी निलंबित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महापालिकेच्या मेनरोडवरील पूर्व विभागाच्या कार्यालयात सोमवारी दुपारच्या सुमारास आरोग्य विभागाचे सात कर्मचारी पत्ते खेळताना आढळून आल्याने त्यांना निलंबित करण्याचे आदेश प्रशासनाचे उपआयुक्त दीपक कासार यांनी मंगळवारी दिले आहे.

सोमवारी राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी या कार्यालयात गेले असता हे कर्मचारी पत्ते खेळताना दिसले. हा प्रकार त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना सांगताच संबंधित अधिकार्‍यांनी तेथे धाव घेतली. उपआयुक्त कासार यांनी संबंधित कर्मचार्‍यांना निलंबित करण्याचे तसेच चौकशी करण्याचे आदेश विभागीय अधिकार्‍यांना दिले.