आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकरोड- इंडिया सिक्युरिटी, करन्सी नोट प्रेस अंतर्गत वेल्फेअर फंड कमिटीच्या द्वैवार्षिक निवडणुकीत ज्ञानेश्वर जुंद्रे, जगदीश गोडसे, माधवराव लहांगे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी कामगार पॅनलने दणदणीत विजय मिळवला. प्रतिस्पर्धी रामभाऊ जगताप, अशोक गायधनी यांच्या नेतृत्वाखालील आपला पॅनलचा त्यांनी साफ धुव्वा उडविला.
करन्सी नोट प्रेसमधील सर्वच्या-सर्व सात व इंडिया सिक्युरिटी प्रेसमधील आठपैकी सात जागांवर कामगार, तर एकमेव जागेवर अवघ्या 30 मतांनी आपला पॅनलचा उमेदवार विजयी झाला. स्टाफ व चतुर्थ र्शेणीच्या एका जागेवर कामगार पॅनल सर्मथक उमेदवारांचा विजय झाला. एकंदरीत 18 पैकी 17 जागा कामगार पॅनलने जिंकल्या, तर एकमेव जागेवर आपला पॅनलला समाधान मानावे लागले. वेल्फेअर फंड कमिटीच्या 18 जागांसाठी शनिवारी निवडणूक झाली. सोमवारी दोन्ही प्रेसच्या विभागात मतमोजणी झाली.
विजयी उमेदवार (कंसात त्यांना मिळालेली मते)
करन्सी नोट प्रेस (जागा- सात) : सतीश चंद्रमोरे (1062), मुरलीधर जगताप (1030), बाळासाहेब ढेरिंगे (1031), मच्छिंद्र जाधव (1038), तुळशिराम पाटोळे (1023), आण्णा सोनवणे (1038), सुभाष चव्हाण (1114) (सर्व कामगार पॅनल).
इंडिया सिक्युरिटी प्रेस (जागा- आठ) : बळवंत आरोटे (1500), अशोक अहिरे (1459), डॉ. चंद्रकांत हिंगमिरे (1924), मनीष कोकाटे (1617), ज्ञानेश्वर गायकवाड (1600), भीमा साळवे (1458), परशुराम पैठणकर (1615) (सर्व कामगार पॅनल)
आपला पॅनल : रघुनाथ वाणी (1322) तर स्टाफमधून कामगार पॅनलचे सुरेश बोराडे (433), शेखर पगारे (443) आणि चतुर्थ र्शेणीतून विलास बोराडे (134) विजयी झाले. निकाल जाहीर होताच कामगार पॅनल सर्मथकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करून आन्ांदोत्सव साजरा केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.