आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुन्या नाशकात आर्थिक वादातून हाणामारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जुन्या नाशिकमधील नानवली भागात सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास आर्थिक वादातून झालेल्या मारहाणीत चौघे जण जखमी झाले. दोन गटात समोरासमोर दगडफेक झाल्याने नागरिकांची पळापळ झाली. त्यातच दोन्ही गट विभिन्न समाजाचे असल्याने दंगलीची अफवा पसरून परिसरात काही काळ तणावही निर्माण झाला. वरिष्ठ अधिकाºयांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
अमरधाम परिसरात जुगार खेळताना रूपेश दत्तू सासे, आदिल, मुनीर व वजीर या चार मित्रांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. मारहाणीत सासे गंभीर जखमी झाला. हा प्रकार समजताच दीपक व शैलेश दत्तू सासे आणि त्यांच्या मित्रांनी तिघा संशयितांना जाब विचारला. त्याचा राग येऊन दोन्ही गट समोरासमोर आले. आरडाओरड, गोंधळ सुरू झाल्याने दंगलीची अफवा पसरली. त्यामुळे नागरिकांची पळापळ होऊन दुकाने बंद करण्यात आली. याचवेळी दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केल्याने परिस्थिती बिघडून तणाव निर्माण झाला. मात्र, जातीय वाद नसल्याचे समजल्याने नागरिक काहीसे निर्धास्त झाले.
सहाय्यक आयुक्त गणेश शिंदे, वरिष्ठ निरीक्षक बाजीराव भोसले यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेत तातडीने संशयित आदिल, मुनीर भंगारवाला, भिक्कू ऊर्फ वजीर, तन्वीर शेख, समीर शेख आणि वाजीद आदी सात जणांना अटक केली . परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या मार्गदर्शनानुसार उपआयुक्त साहेबराव पाटील, सहाय्यक आयुक्त अविनाश अंबुरे, निरीक्षक कैलास घोडके, मौला सय्यद यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने तणाव निवळला.
अंधारामुळे भीतीची छाया
रात्री दहाच्या समुारास संपूर्ण जुने नाशिक भागातील वीज गेल्याने नागरिकांमध्ये पुन्हा धास्तीचे वातावरण निर्माण झाले होते. मारहाणीत जखमी झालेल्या सासे बंधूंना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.