आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशिया खंडातील सर्वात मोठी धावपट्टी असलेले नाशिकचे विमानतळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- केवळ पायाभूत सुविधा नसल्यामुळे यापूर्वी नाशिकमधील विमानसेवा कोलमडली. मात्र, आशिया खंडातील सर्वात मोठी धावपट्टी असलेल्या ओझर विमानतळाचा पर्याय असल्यामुळे स्वत:हून विमान सेवा पुरवणार्‍या कंपन्याच घिरट्या घालतील, असा आशावाद राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे उद्घाटक तथा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनीही दिल्ली, मुंबईनंतरचे जिल्हा पातळीवरील प्रथम क्रमांकाचे सुविधासंपन्न विमानतळ म्हणून नाशिकच असेल, असे सांगत स्तुतिसुमने उधळली.

हा सोहळा सोमवारी (दि. 3) सायंकाळी पार पडला. या वेळी भुजबळ म्हणाले की, परदेशातील विमानतळ व आपल्याकडील विमानतळ पाहिल्यावर कमालीची निराशा होत होती. मात्र, नागरी उड्डाण खाते पटेल यांच्याकडे आल्यानंतर देशातील विमानतळांचा चेहरामोहराच बदलला. त्यामागे विकास हेच एकमेव कारण असून, त्याच विचारधारेवर नाशिकचा कायापालट केला. नाशिकमध्ये सहापदरी रस्ते असून, मुंबईला जायचे तर अडीच तास खूप होतात. नाशिकमध्ये विमानसेवा सुरू झाली. मात्र, एचएएल, एअरफोर्सच्या सेवा सांभाळून विमानसेवेची कसरत कंपन्यांना परवडली नाही. त्यामुळे स्वतंत्र विमानतळाचा प्रस्ताव पुढे आला व तत्कालीन अधिकार्‍यांनी युद्धपातळीवर प्रयत्न केल्यावर जेमतेम एका वर्षात विमानतळ तयार झाल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. चांगल्या सुविधांमुळे आता विमान कंपन्या स्वत:हून नाशिककडे धाव घेतील, असे सांगतानाच त्यांनी विमानसेवा सुरू करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडे पाठपुरावा करण्याचेही आश्वासन दिले. या वेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सिंहस्थ कुंभमेळा व नाशिकचे महत्त्व लक्षात घेऊन ‘रिलीजस टुरिझम’ (धार्मिक पर्यटन) होण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. या वेळी तापी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ए. टी. पवार, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार पंकज भुजबळ, जयवंत जाधव, एच.ए.एल.चे व्यवस्थापकीय संचालक सुब्रमण्यम, जिल्हाधिकारी विलास पाटील, मनपा आयुक्त संजय खंदारे, बांधकाम विभागाचे प्रभारी अधीक्षक अभियंता पी. वाय. देशमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, फिटले पारणे...82 कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या ओझर विमानतळ