आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेची वाट, खासगीकरणाचा घाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- तीर्थभूमी असलेल्या नाशिकच्या वैभवात पांडवलेणीजवळ 29 एकर जागेवर बांधलेल्या फाळके स्मारकाने मानाचा शिरपेच खोवला. मुंबई-नाशिक महामार्गावरील हे स्मारक अल्पावधीतच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. संगीताच्या तालावर थिरकणार्‍या पाण्याचा कारंजा, वॉटरपार्कपासून सर्वच सुविधांची भरभरून प्रशंसा झाली. मात्र, कालांतराने त्याची पुरेशी देखभाल झाली नाही. देखभाल करणार्‍या कर्मचार्‍यांकडूनही दुर्लक्ष झाले. प्रामुख्याने फाळके स्मारकातील बहुतांश भाग हा उद्यानाच्या स्वरूपात असून, त्याची खासगी ठेकेदाराकडून पुरेशी देखभाल झालीच नाही. मागील अनुभव ताजा असताना संपूर्ण स्मारकाचेच खासगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे.

मजुरांपेक्षाही कमी वेतन
2002 पासून फाळके स्मारकात सुमारे 44 कर्मचारी आहेत. या कर्मचार्‍यांना दरमहा किमान वेतनाच्या रूपात नऊ हजारांपर्यंत मानधन मिळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात या खासगीकरणानंतर केवळ तीन हजार रुपये प्रतिकर्मचारी दिले जात आहे. याव्यतिरिक्त एक हजार रुपये बोनसच्या रूपात दिले जात आहे. ठेकेदाराकडून मिळणार्‍या मानधन वाढविण्याविषयी कर्मचार्‍यांनी मागणी करूनही दाद मिळालेली नाही. दुसरीकडे ठेकेदाराच्या कामाकडे महापालिकेचे लक्ष नसल्यामुळे कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडेही दुर्लक्ष झाले आहे. परिणामी, कर्मचार्‍यांकडूनही अस्वच्छतेकडे काणाडोळा केला जात आहे.

कलादालनही झाले भकास
स्मारकात दोन कलादालने असून, पहिल्या दालनात दादासाहेब फाळके यांच्या सिनेमापासून भारतीय सिनेमाचा प्रवास दाखविण्यात आला आहे. 608 चौरस मीटरचा मोठा हॉल असूनही त्याचा पुरेसा वापर करता आलेला नाही. दुसर्‍या कलादालनात तर फक्त नारोशंकराच्या मंदिराची प्रतिकृती आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष
फाळके स्मारक हे पर्यटकांचे आकर्षण ठरले. मात्र, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे त्याची दुरवस्था होत आहे. कामगारांच्या वेतनाच्या तक्रारींमुळे त्यांना काम करावेसे वाटत नाही. अजय भोवरे, सामाजिक कार्यकर्ता

पाठपुरावा सुरू आहे
यासंदर्भात मी वेळोवेळी महापौर व मनपा आयुक्तांकडे पाठपुरावा केला आहे. स्मारकाच्या विकासासाठी या वेळी बजेटमध्ये तरतूद करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच, कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सुटला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू. सुदाम कोंबडे, नगरसेवक

कर्मचार्‍यांची हेळसांड
दादासाहेब फाळके स्मारकाच्या स्थापनेपासून त्या ठिकाणी कामावर रुजू असलेल्या सुमारे 43 कर्मचार्‍यांना ठेकेदारांकडून किमान वेतन दिले जात नाही. अनेक कर्मचार्‍यांना ठेकेदारांनी कामावरून काढून टाकले आहे. कर्मचारी कामावर नसल्यानेच स्मारकाची दुरवस्था झाली आहे. पदाधिकारी, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना

वस्तुसंग्रहालय केले स्थलांतरित
दादासाहेब फाळके यांचा चित्ररूपी जीवनपट आकर्षणाचे केंद्र होते. त्यात चित्रपट तयार करताना आलेल्या अडचणीपासून, तर गाजलेले चित्रपट, सहकलावंतांची माहितीही होती. मात्र, त्याची दुरवस्था झाल्यामुळे त्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवणेच पसंत केले. कालांतराने येथे फाळके फिल्म्स सोसायटीच्या वतीने दाखवले जाणारे चित्रपटही बंद करण्यात आले. काही दिवसांतच पुरातन वस्तुसंग्रहालय अन्यत्र हलविण्यात आले आहे.

मिनी थिएटरची स्क्रीन कोमेजली
छोटेखानी चित्रपट, डॉक्युमेंटरी, बाल चित्रपट दाखवण्यासाठी मिनी थिएटरची संकल्पना साकारण्यात आली. मात्र, प्रोजेक्टर व सुयोग्य स्क्रीनची व्यवस्थाच नसल्याने आजघडीला छोटी- मोठी गाणी तसेच विविध संस्थांना त्यांच्या वर्धापनदिनासाठी आपली माहिती देण्याकरिता मिनी थिएटरचा वापर होत आहे. या थिएटरचे बुकिंग ऑफिस तर धूळखात असून, 346 चौरस मीटर जागेत जवळपास 300 प्रेक्षक बसू शकतील अशा वास्तूला दुर्दशेचे ग्रहण लागले आहे.

खुल्या चित्रपटगृहाची दुर्दशा
संगीत कारंजास लागून असलेले खुले चित्रपटगृहदेखील अनेक वर्षांपासून बंद पडले आहे. भिंतीवर पांढर्‍या रंगाने तयार केलेले पडदे चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत. येथे सुरुवातीचे काही दिवस जुने चांगले कृष्णधवल चित्रपट दाखवले जात होते. त्यालाही रसिकांची भरभरून दाद होती. मात्र, कालांतराने असे चित्रपट दाखविणेच बंद झाले. आता हळूहळू येथील गोलाकार खुच्र्यांची चोरी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे खुले चित्रपटगृहही ओसाड पडून आहे.


दृष्टिक्षेपात समस्या

  • आकर्षणाचे केंद्र असलेला संगीत कारंजा बंद
  • उपाहारगृहाजवळील कारंजा बंद, फरश्याही झाल्या गायब
  • झोपाळे तुटलेले, बसण्यासाठी पुरेसे बाकडे नाहीत
  • मेरी गो राउंडसारख्या तुटलेल्या खेळणी उपाहारगृहाजवळ फेकलेल्या अवस्थेत
  • उपाहारगृह अनेक महिन्यांपासून बंद, त्याबाहेरील परिसरात घाणीचे साम्राज्य
  • मैदानावर गाजरगवताचा वाढला उच्छाद; हिरवळही झाली गायब
  • प्रेमी युगुलांचा वाढता वावर
  • भटक्या कुत्र्यांचे आर्शयस्थान, सापांचाही धोका
  • बंद पथदीप, शोभेचे दिवेही पडले बंद


नाशिकच्या शिरपेचात वैभवाचा तुरा खोवणार्‍या चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकाची पालिकेनेच वाट लावून आता नवनिर्माणाच्या नावाखाली खासगीकरणाचा घाट घातल्याचे डी.बी. स्टारच्या पाहणीत उघड झाले. ‘उपाशीपोटी सैन्यही चालू शकत नाही’ या उक्तीप्रमाणे पालिकेने कर्मचार्‍यांची आर्थिक कोंडी केली व देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे फाळके स्मारकाची दुर्दशा झाल्याचे समोर आले आहे..

वुलर सरोवर, जम्मू-काश्मीर
प्राचीन काळात या सरोवराला ‘महापद्मसर’ असे म्हटले जात होते. नंतर त्याचे नाव वुलर असे पडले.
14 मीटर खोल असलेल्या या सरोवराची समुद्र सपाटीपासून 1580 मीटर उंची आहे.
16 किलोमीटर लांब आणि 9.6 किलोमीटर रुंद हे सरोवर आहे.
1444 मध्ये काश्मीरचा सुलतान जैन-उल-अबादीन याने वुलरच्या उत्तर-पूर्व कोपर्‍यात जैनुल लंक नावाचे बेट तयार केले आहे.
30 ते 260 चौरस किलोमीटरमध्ये या सरोवराचा आकार बदलत जातो.
जम्मू आणि काश्मीर राज्यातील बांडमोर जिल्ह्यातील हे सरोवर भारतातील सर्वात मोठे गोड पाण्याचे सरोवर आहे.

पर्यटकांची पाठ
दादासाहेब फाळके यांच्या स्मारकात फाळके यांचा चित्ररूपी जीवनपट मांडण्यात आला आहे. चित्रपट तयार करताना आलेल्या अडचणी फाळके यांचे सहकलावंत अशी अनेक प्रकारची माहिती तेथे आहे. परंतु, या ठिकाणी झालेल्या दुरवस्थामुळे पर्यटकांनी येथे येणेच बंद केले आहे. रफीक साबीर, सामाजिक कार्यकर्ता

छडीच्या आकाराचा हा युनिव्हर्सल रिमोट अत्यंत उपयोगी आहे. याच्या मदतीने 13 प्रकारच्या क्रिया नियंत्रित करता येतील. टीव्ही, डीव्हीडी, स्टिरिओ सिस्टिमला नियंत्रित केले जाऊ शकते. याला मागे- पुढे, वर- खाली, उजवीकडे-डावीकडे करून वेगवेगळ्या सिस्टिम नियंत्रित करता येऊ शकतात. यात आवाज कमी-जास्त करणे, चॅनल बदलणे, एफएम स्टेशन बदलण्यासारखे काम करता येते.