आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: डोक्यात दगड घालून पंचवटीत भिकाऱ्याचा खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नाशिक- पंचवटीत झोपण्याच्या जागेच्या वादातून दोन भिकाऱ्यांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसान थेट खूनात झाल्याची घटना मंगळवारी (दि.९) सकाळी वाजता पंचवटी कारंजा येथे उघडकीस आली. या घटनेत एक भिकाऱ्याने दुसऱ्या भिकाऱ्याच्या डोक्यात दगड घालून निर्घून खून केला. याप्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायंकाळी एका संशयित भिकाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी कारंजा परिसरातील इंद्रकुंडावरील एका ट्रॅव्हल्स कार्यालयाखाली हा प्रकार घडला. ट्रॅव्हलचे कार्यालय रात्री बंद झाल्यानंतर परिसरातील काही भिकारी येथे झोपण्यास येतात. सोमवारी काही भिकारी येथे झोपण्यास आले होते. यात एक फिरस्ता भिकारी आला होता. झोपण्याच्या वादातून दोघांमध्ये वाद झाले. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यातील एका भिकाऱ्याने दुसऱ्या भिकाऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. सकाळी एका रिक्षाचालकाने हा प्रकार पोलिसांना कळवला. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, विजय मगर, सहायक आयुक्त विजयकुमार चव्हाण, वरिष्ठ निरिक्षक दिनेश बर्डेकर यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाच्या सूचना केल्या. सायंकाळी पोलिसांनी पंचवटी कारंजा परिसरात राहणाऱ्या एका भिकाऱ्यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान,या परिसरात भिकाऱ्यांमध्ये वाद होण्याचे प्रकार नवीन नाहीत. चार वर्षांपूर्वी गणेशवाडीत नवीन भाजीबाजारात झोपण्याच्या वादातून एका भिकाऱ्याचा खून झाला होता. 
बातम्या आणखी आहेत...