आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक : पांडवलेणी परिसरात मोरांचा मुक्तसंचार...नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची वर्दळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको : शहरीकरणात वनसंपदेचा ऱ्हास होत असला तरीही, पांडवलेणीसारख्या ठिकाणी ही वृक्षराजी आणि पशु-पक्ष्यांचा अधिवास टिकून आहे. गेल्या आठवड्यापासून शहरात पावसाला सुरुवात झाल्याने या भागात मोरांचा मुक्तसंचार पाहायला मिळतो आहे. मोरांचे हे वैभव पाहण्यासाठी नाशिककरांची गर्दी होते आहे.
 
सुटीच्या दिवशी किंवा फिरण्यासाठी नाशिककर पांडवलेण्यांवर जातात. ऐतिहासिक पांडवलेणी नैसर्गिकदृष्ट्यासुद्धा तितकेच सुंदर आहे. या ठिकाणी अनेक पक्षी पहायची संधी असते. अनेक पक्षीप्रेमी त्यांची छबी टिपण्यासाठी आतूर असतात. सर्वसामान्य पर्यटकांनाही मोबाइलमध्ये फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. सध्या समूहाने मुक्तसंचार करणारे मोर कुतूहलाचा विषय बनले आहेत. पिसारा फुलणारा मोर पाहण्यासाठी मात्र तासन‌्तास वाट पाहावी लागते. मात्र, एकदा असा मोर पाहिला की, आनंदाला पारावार उरत नाही. 
गेल्या आठवड्यातील जोरदार पावसामुळे पांडवलेणी परिसर हिरवाईत हरवू लागला असताना, त्याला आता मोरपिसांचा साज लाभला आहे. त्यामुळे नाशिककरांसह बाहेरगावच्या पर्यटकांचाही ओघ या भागाकडे वाढू लागला आहे. 
 
आनंद निराळाच 
-मला अनेक पक्ष्यांच्या छबी टिपण्याचा छंद आहे. पांडवलेणी येथील मोरांचे फोटो घेणे म्हणजे एक निराळाच आनंद असतो. त्यातून एक नवा अनुभव मिळतो. या पक्ष्यांच्या सुंदरतेची तेव्हा जाणीव होते. -आशुतोष कदम, युवा फोटोग्राफर 
बातम्या आणखी आहेत...