आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अारक्षित भूखंड ताब्यात घेण्यात दिरंगाई; पार्किंगचा प्रश्न बिकटच हाेत जाई...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर हाेत चालली असून, पालिका तसेच पाेलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यात अाणखीनच भर पडत अाहे. मुख्य म्हणजे, शहरात पालिकेकडून पार्किंगसाठी अारक्षित करण्यात अालेल्या ३२ ठिकाणांचा ताबा घेण्यात राजकीय अडथळे येत असल्याने वाहनचालकांना मात्र जागा मिळेल तेथे अापली वाहने उभी करावी लागत अाहे. परिणामी, अनेक रस्त्यांना ‘पार्किंग स्पाॅट’चे स्वरूप येत असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत दिसून अाले अाहे. एमजीराेड, अशाेक स्तंभ, सीबीएस, जीपीअाेराेड, सातपूर, सिडकाे परिसरात कारवाईअभावी वाहतूक काेंडी अन‌् अपघातांची समस्या गंभीर बनत चालली अाहे.
‘नाशिकफर्स्ट’च्या पाठपुराव्याने झाले सर्वेक्षण
शहरात गंभीर स्वरूप धारण करीत असलेल्या वाहतुकीबाबत नाशिक फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी वेळाेवेळी पालिकेशी पत्रव्यवहार केला. त्यामुळे पार्किंगच्या प्रश्नावर ताेडगा काढण्यासाठी तत्कालीन अायुक्तांनी दिल्लीच्या संस्थेस पार्किंगच्या नियाेजनाचे सर्वेक्षण करण्याचे काम दिले अाले. त्या संस्थेमार्फत प्रत्यक्षात कामास सुरुवातही करण्यात अाली अाहे. मात्र, या कंपनीने निश्चित केलेल्या जागा ताब्यात घेण्यास प्रशासनास अडचणी येत असल्याने पार्किंगचा प्रश्न लांबणीवर पडला अाहे. त्यामुळे वाहनधारक जागा मिळेल तेथे अापापली वाहने उभी करतात. जागाच उपलब्ध नसल्याने शहरातील बेशिस्त पार्किंग वाढतच अाहे.

फक्तदुचाकींवरच कारवाई, चारचाकींचे काय...?
शहरातील पार्किंगचा प्रश्न शहरवासीयांसाठी डाेकेदुखी ठरत अाहे. बहुतांश विभागांत वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेलाच वाहने लावली जात असल्याने अपघाताच्या घटनांमध्येही सातत्याने वाढ हाेत अाहे. पाेलिस प्रशासन फक्त दुचाकी वाहने उचलून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यास प्राधान्य देत असल्याने शहरातील वाहतुकीचा राेजच बाेजवारा उडत अाहे. पार्किंगला पाहिजे त्या प्रमाणात जागा उपलब्ध नसल्याने वाहनधारक मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी करतात अन‌् वाहतूक कोंडी हाेते. वाहतूक पोलिसांनी अशा बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांवर कार्यवाही करून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी प्रभावी उपाययाेजना हाेणे गरजेचे बनले अाहे.

या उपाययाेजना केल्यास सुटेल पार्किंगचा प्रश्न
>पार्किंगप्रश्नी ‘नाशिकफर्स्ट’ने तत्कालीन मनपा अायुक्त संजय खंदारे यांच्याशी पत्रव्यवहार करून काही उपाययाेजना सुचविल्या हाेत्या. त्यानुसार विकासासाठी ठाेस याेजना अाखावी, लाेकांच्या सूचना मागवाव्यात, लाेकांमध्ये जनजागृतीसाठी ठिकठिकाणी नाे पार्किंगचे बाेर्ड लावून त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठीची दंडाची रक्कम नमूद करावी. ही रक्कम जास्त असावी. जेणेकरून दुसऱ्यांदा वाहनधारक तेथे वाहन उभे करणार नाही. प्रसारमाध्यमे रेडिअाेद्वारे सतत नाे पार्किंगच्या जागांची माहिती द्यावी. >शहरातीलड्रायव्हिंगस्कूलमार्फत विद्यार्थ्यांना नाे पार्किंगची माहिती द्यावी. अारटीअाेने वाहन चालविण्याचा परवाना देताना शहरातील ‘नाे पार्किंग झाेन्स’चे ज्ञान पडताळूनच परवाना द्यावा. >नाेपार्किंगमध्येसीसीटीव्ही बसवावेत. तसेच, अधिकाऱ्यांनी किती दंड वसूल केला याची सतत माहिती घ्यावी. >महत्त्वाचेव्यक्ती,अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, प्राचार्य, राजकीय पुढारी या सर्वांनाच नियम पाळण्याबाबत सांगावे, जेणेकरून ते त्यांच्या चालकांना तशा सूचना करतील.

समिती गठित झाली, मात्र प्रश्न रेंगाळलेलाच..
पार्किंगचा प्रश्न साेडविण्यासाठी पालिका प्रशासनाने एक समिती गठित केली अाहे. या समितीत नाशिक फर्स्टच्या ते पदाधिकाऱ्यांचा समावेश अाहे. तसेच, पालिकेसह पाेलिस प्रादेशिक परिवहनच्या अधिकाऱ्यांचाही यात समावेश अाहे. तसेच दिल्ली येथील कंपनी शहरातील पार्किंगचे नियाेजन कसे करता येईल, याबाबतचा चित्रीकरणासह अहवाल प्रशासनाला सादर करणार अाहे. मात्र, सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीने प्रशासनास सुचविलेल्या अनेक जागांवर राजकीय अतिक्रमण तर काही जागा ताब्यात घेण्यास अडचणी निर्माण हाेत असल्याची माहिती एका पदाधिकाऱ्याने नाव छापण्याच्या अटीवर दिली अाहे.

तात्पुरती उपाययाेजना अाहे सहज शक्य...
दिल्लीस्थित कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या सर्व्हेचे काम लांब पल्ल्याचे अाहे. मात्र, पार्किंगच्या त्रासाचा नाशिककरांना दरराेजच सामना करावा लागत अाहे. यावर पाेलिस प्रशासनाच्या वतीने सुनियाेजन करणे गरजेचे अाहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांवर जामर लावून कारवाई करण्याचा धडाका सुरू केल्यास काही प्रमाणात बेशिस्त पार्किंग करण्याच्या प्रकारावर अाळा बसेल. परंतु, जामर वजनास जड असल्याने वाहतूक विभागामार्फत फक्त दुचाकीस्वारांनाच लक्ष्य केले जात अाहे. त्यांच्याकडून दंड वसूल करून टार्गेट पूर्ण करण्याचे काम वाहतूक विभागाकडून केले जात अाहे.

एमजीराेड, अशाेकस्तंभ परिसरात राेज डाेकेदुखी
एम. जी. राेडवर माेठ्या प्रमाणात व्यापारी संकुल असल्याने या ठिकाणी खरेदी-विक्रीसाठी नेहमीच ग्राहकांची वर्दळ असते. दुकानात येणारे ग्राहक अापले वाहन घेऊनच खरेदीला येत असल्याने त्यांना या ठिकाणी वाहन लावण्यास नेहमीच अडचण निर्माण हाेतेे. परिणामी, जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी केली जातात. एमजीराेडसह अशाेकस्तंभ भागातही पार्किंगचा प्रश्न वाहनधारकांसाठी कायमचीच डाेकेदुखी ठरत अाहे.

ठक्कर बझार माॅलजवळ बेकायदेशीर पार्किंग
ठक्कर बझार बसस्थानकासमाेरील जिल्हा रुग्णालयाच्या भिंतीलगतच चारचाकी वाहने उभी केली जातात. त्यामुळे बसस्थानकातून बस बाहेर काढताना अात नेताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. सिटी सेंटर माॅलच्या परिसरातही रस्त्याच्या दाेन्ही बाजूला चारचाकी वाहने उभी केली जातात. त्यामुळे या रस्त्यांवर अपघाताची मालिका सुरू अाहे.

न्यायालयाच्या अादेशाची पायमल्ली
शहरातील पार्किंगच्या प्रश्नावर ताेडगा काढण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या अाैरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार काेणत्याही इमारतीमधील पार्किंगची जागा ही पार्किंगसाठीच वापरली गेली पाहिजे. त्या जागेचा व्यावसायिक वापर हाेता कामा नये. पार्किंगबाबत असे स्पष्ट निर्देश असतानादेखील नाशिक शहरातील अनेक इमारतींतील पार्किंगच्या जागांचा व्यावसायिक वापर केला जात असल्याचे दिसून येते. महापालिका प्रशासनाने न्यायालयाच्या अादेशाचे पालन केल्यास काही अंशी पार्किंगचा प्रश्न सुटू शकेल. मात्र, प्रत्यक्षात तसे हाेताना दिसून येत नाही.

काॅलेजराेड, गंगापूरराेड परिसरात राेजच ‘कोंडी’
काॅलेजराेड गंगापूरराेडला जाेडणाऱ्या डिसूझा काॅलनीतील एका चहा टपरीजवळ सर्रासपणे रस्त्याच्या कडेला बेशिस्त पार्किंग केली जाते. विशेषत: सायंकाळी वाहनधारक रस्त्याच्या दाेन्ही बाजूला वाहने उभी करतात, त्यामुळे या रस्त्याने मार्गक्रमण करणे जिकिरीचे ठरते. यांसह महात्मानगर परिसरातही अनेक ठिकाणी ही समस्या उद‌्भवते.

क्र. शिवार/ सर्व्हे नं. अारक्षण क्र.
१.सातपूर गावठाण (त्र्यंबकराेड) १५३
२. सातपूर ४९३ पै १६७
३. देवळाली स.नं. ३१ पै (जगताप मळा) १८१ (२०)
४. देवळाली स.न.ं ४२ पै २०० (२०)
५. देवळाली १२२ पै २०४ (२०)
६. देवळाली ११७ पै (नाट्यगृह, वाचनालय) २०७ (२०)
७. देवळाली २४० २२३ (२०)
८. विहितगाव ८० २१ब २४२ (२०)
९. नाशिक २३२ पै (रासबिहारी शाळेमागे) २८१
१०. नाशिक फा.प्लाॅ.नं. ३९१ पै (कॅनडा काॅर्नर) ३०१ (१३)
११. नाशिक फा.प्लाॅ.नं. ४१६ पै ३०५ (१३) (मूकबधिर शाळेसमाेर)
१२. नाशिक फा.प्लाॅ.नं.४३४ पै ३१४ (९) (प्रसाद मंगल कार्यालयानजीक)
१३. नाशिक फा.प्लाॅ.नं. ४७९ पै (शरणपूर मार्केट) ३३४ (१३)
१४. नाशिक फा.प्लाॅ.नं. ३६१ पै (‘पद््मा’समाेर) ३४८ (१४)
१५. नाशिक फा.प्लाॅ.नं. ६० पै (मुंबई नाका) ३४९ (१४)
१६. नाशिक फा.प्लाॅ.नं. ५४१ पै (पीटीसीसमाेर) ३६३ (१३)
१७. नाशिक स.नं. ८७९ ३७४
१८. वडाळा स.नं. २१, २२, ३२ पै (पखालराेड) ४०० (१९)
१९. नाशिक फा.प्लाॅ.नं. २७४ पै (द्वारका सर्कल) ४१३ (१४)
२०. नाशिक ४३२ (काठे गल्ली) ४१६ (१४)
२१. नाशिक १०२ पंचवटी (इंद्रकुंड) ४३४
२२. नाशिक १४२ पै (सीतागुंफाजवळ) ४३९
२३. नदीकाठ (सुंदरनारायण मंदिराजवळ) ४४९
२४. सिसनं १०६० पै (सुंदर नारायण मंदिराजवळ) ४५०
२५. नाशिक फा.प्लाॅ.नं. ४५१ २६ पै नर क्र. (रविवार कारंजा)
२६. नाशिक फा.प्लाॅ.नं. ४५२ २९ पै नर क्र. (रविवार कारंजा)
२७. सिसनं १४०२ ते १४१० (सराफ बाजार) ४५२
२८. सिसनं १३३ ते १३७ (चित्रमंदिरजवळ) ४५४
२९. नाशिक फा.प्लाॅ.नं. ४८५ १३१ पै नर क्र. (राजेबहाद्दर कंपाउंड)
३०. सिसनं ५८७७ (अशाेक थिएटरजवळ) ४८९
३१. नदीकाठ (चक्रधर स्वामी मंदिर) ४९२
३२. नदीकाठ (नाराेशंकर मंदिराजवळ) ४९८
थेट प्रश्न
विजय पाटील, पाेलिसउपायुक्त (प्रशासन)
शहरातील वििवध भागांत अारक्षित करण्यात अालेल्या ३२ जागांचा वाहनधारकांना लाभ नाहीच; पाेलिस अन‌् अारटीअाे विभागाकडूनही दुर्लक्षच
सुमारे १७ लाख लाेकसंख्या असलेल्या नाशिक शहरात पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल हाेत अाहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शहरात पार्किंगबाबत प्रभावी धाेरण अाखून विविध भागांत सुमारे ३२ ठिकाणी पार्किंगचे अारक्षण टाकले. प्रत्यक्षात मात्र संबंधित जागांपैकी बहुतांश जागा राजकीय पदाधिकाऱ्यांच्या ताब्यात असल्याने ताबा मिळवण्यास पालिका अधिकाऱ्यांकडून काणाडाेळा केला जात असल्याचे दिसून येत अाहे. पालिका, पाेलिस प्रादेशिक परिवहन विभागाने समन्वयाने प्रभावी उपाययाेजना राबवून पार्किंगसाठी अारक्षित भूखंड ताब्यात घ्यायला हवेत. मात्र, तसे हाेत नसल्याने जागा दिसेल तिथे अाजघडीला वाहनधारकांना अापली वाहने उभी करावी लागत अाहेत. परिणामी, वाहतूक काेंडीचा प्रश्न अधिकच बिकट झाला अाहे. प्रशासनाच्या या उदासीन कारभारावर ‘डी. बी. स्टार’चा हा प्रकाशझाेत...
मंजूर अारक्षित वाहनतळे अशी...
{ शहरात दिवसेंदिवस पार्किंगचा प्रश्न बिकट हाेत असताना अापल्या विभागाकडून काय ठाेस उपाययाेजना केल्या जात अाहेत?
-शहरातील
पार्किंगचा प्रश्न साेडविण्यासाठी पाेलिस प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असते. पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, यासाठी अाम्ही सर्व्हे करून महापालिकेला त्याबाबतचा अहवाल दिला असून, त्यावर तत्कालीन महापालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी बैठकही घेतली हाेती. मात्र, त्यांची बदली झाल्याने पुन्हा हा प्रश्न रेंगाळला अाहे.
{रस्त्याच्या कडेला वाहने उभी करणाऱ्यांवर पाेलिसांकडून कारवाई का हाेत नाही?
-रस्त्याच्या कडेला बेशिस्त पार्किंग करण्याचा प्रकार नाशिकमध्ये माेठ्या प्रमाणात अाहे. ‘नाे पार्किंग’मध्ये दुचाकी उभी करणाऱ्यांवर कारवाईसाठी ठेका दिला अाहे. तर चारचाकी वाहनांवर कारवाईसाठी जामरचा वापर केला जाताे. यासाठी पाेलिसांकडे सद्यस्थितीत ४० जामर अाहेत.
{ही तात्पुरती कारवाई अाहे, प्रभावी उपाययाेजना काय?
-प्रभावी कारवाई हाेण्यासाठी एक याेजना अाखण्यात अाली अाहे. ती लवकरच कार्यान्वित करण्यात येणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...