आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Pilgrims Safe Return From Uttarakhand Flood

उत्तराखंडातून नाशिकचे 56 भाविक परतले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - उत्तराखंडमधील प्रलयात नाशिक जिल्ह्यातील 228 भाविक अडकले होते. त्यातील 56 भाविक सुखरूप घरी परतल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे बुधवारी सांगण्यात आले आहे. सध्या 133 भाविक परतीच्या मार्गात असून, विविध ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या माध्यमातून ते घरी येत आहेत. 37 यात्रेकरू हे लष्कराच्या हर्षल बेस कॅम्प आणि भोलेनाथ येथे सुखरूप पोहचल्याची माहिती उत्तराखंड सरकारकडून मिळाल्याचे नायब तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले. तसेच दोन यात्रेकरूंचा अद्याप शोध सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

परतीचा प्रवास सुरू- नाशिकसह जिल्ह्यातील जवळपास दहाहून अधिक कुटुंबीय सुखरूपपणे हरिद्वार येथे पोहोचले असून, त्यांचा परतीचा प्रवास सुरू आहे. खुटवडनगर येथील मधुकर पाटील व त्यांचे कुटुंबीय गुरुवारी सकाळपर्यंत नाशकात पोहचण्याची शक्यता आहे. इगतपुरी येथील अँड. साहेबराव पवार, चंद्रभान वाजे, प्रेमसुख चांडक, महिंद्र चोपडे यांच्यासह आठ जणांना बद्रिनाथ येथून हेलिकॉप्टरद्वारे हरिद्वार येथे आणण्यात आले आहे. यासाठी खासदार समीर भुजबळ यांनी उत्तराखंड सरकारकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान, नाशिक व औरंगाबाद येथील भाविकांसोबत असलेल्या रामसिंग चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार किमान दहा कुटुंबे दिल्लीपर्यंत आली असून, तिथून रेल्वेद्वारे परतत आहेत. त्यातच मधुकर पाटील हे त्यांची दोन मुले, पत्नी, साडू, मेहुणी यांच्यासह दिल्लीहून सुरतपर्यंत आले असून, सकाळी 10पर्यंत नाशकात पोहचणार असल्याचे त्यांनीच सांगितले.

योगेश ट्रॅव्हल्सचे भाविक परतले-नाशिकच्या योगेश ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून केदारनाथला गेलेले 40 भाविक बुधवारी सायंकाळी 4.30ला नाशिकला पोहचले. भांडीबाजारातील किराणा व्यापारी अरविंद दशपुते यांच्यासह शोभा दशपुते, दत्तात्रय नारायण सोनजे, जयर्शी नारायण सोनजे, गंगाधर धामणे, विजय धामणे, अशोक सोनजे, भारती सोनजे, गंगापूररोडवरील सारडा परिवारातील तीन सदस्य नाशिकला पोहचले. ढगफुटी झाली, त्या वेळी योगेश ट्रॅव्हल्सचे गाइड परेश अमृतकर यांनी गाडी पुढे गुप्तकाशी येथे न नेता मागे नानूपाणी येथे आणली. त्यांच्या अनुभवाच्या जोरावर योग्य ठिकाणी मुक्कामाचा निर्णय घेतल्यानेच आम्ही या भयंकर प्रलयातून वाचल्याचे अरविंद दशपुते यांनी सांगितले. आमच्या बरोबर सिन्नर, वावी व पुणे येथील काही भाविकही सुखरूप आल्याचे त्यांनी सांगितले.


नाशिकचे 56 भाविक परतले
दत्तात्रय नारायण सोनजे, जयर्शी नारायण सोनजे, गंगाधर धामणे, विजय धामणे, अशोक सोनजे, भारती सोनजे, गंगापूररोडवरील सारडा परिवारातील तीन सदस्य नाशिकला पोहचले. ढगफुटी झाली, त्या वेळी योगेश ट्रॅव्हल्सचे गाइड परेश अमृतकर यांनी गाडी पुढे गुप्तकाशी येथे न नेता मागे नानूपाणी येथे आणली. त्यांच्या अनुभवाच्या जोरावर योग्य ठिकाणी मुक्कामाचा निर्णय घेतल्यानेच आम्ही या भयंकर प्रलयातून वाचल्याचे अरविंद दशपुते यांनी सांगितले. आमच्या बरोबर सिन्नर, वावी व पुणे येथील काही भाविकही सुखरूप आल्याचे त्यांनी सांगितले.