आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टवाळखोरांवर बरसला पोलिसांचा ‘दंडुका’, भरदिवसा कोम्बिंग; दीडशे टवाळखोरांवर धडक कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अल्पवयीन मुलींच्या वाढत्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी शहरात परिमंडळ मधील काही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या धडक कारवाईत सुमारे दीडशे टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई पुढेही सुरूच ठेवण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

 

मुलींच्या वाढत्या छेडछाडीच्या प्रकारामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी कॉलेजरोडवर एका अल्पवयीन मुलीस चाकूचा धाक दाखवत तिचा विनयभंग करण्यापर्यंत टवाळखोरांची मजल गेली. पोलिसांची कारवाई थंडावल्याने टवाळखोरांची मस्ती वाढली आहे. कॉलेजरोडवरील घटनेनंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली अाहे. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी टवाळखोरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशान्वये उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, यांच्या पथकाने परिमंडळ मधील कॉलेजरोड, गंगापूररोड, आसारामबापू पूल, मखमलाबाद लिंकरोड, महाविद्यालय परिसर, बस स्थानक आणि जॉगिंग ट्रॅक परिसरात, तर परिमंडळ मध्येही उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक आयुक्त सचिन गोरे यांच्या पथकाने बिटको कॉलेज, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, अंबड लिंकरोड, सातपूर परिसर, औद्योगिक वसाहत, बसस्थानकांत कोम्बिंग राबवत दीडशे टवाळखोरांना ताब्यात घेतले. 

 

मर्दानी पथक घालणार गस्त 
टवाळखोरांवरकारवाईसाठी महिला पोलिसांचे स्वतंत्र मर्दानी पथक गस्त घालणार आहे. मुंबईनाका पोलिस ठाण्यात पहिले पथक स्थापन करण्यात आले आहे. काही दिवसांत १२ पोलिस ठाण्यात महिला पोलिसांचे स्वतंत्र मर्दानी पथक स्थापन करण्याचे आदेश पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

 

गुन्हेगारी नियंत्रणात, टवाळखोर मोकाट 
गुन्हेगारीवरनियंत्रण ठेवण्यास पोलिस दलास यश येत आहे. सराईत गुन्हेगारांसह सहा टोळ्यांच्या म्हाेरक्यांसह सदस्यांना पोलिसांनी गजाआड केले आहे. मात्र, काही दिवसांपासून शहरात टवाळखोरांचा उद्रेक वाढल्याचे छेडछाड, अपहरण आणि हाणामारीच्या घटनांतून निदर्शनास येत आहे. गुन्हेगारांनी पोलिसांपुढे नांगी टाकली असली तरी टवाळखोरांकडून पोलिस यंत्रणेला आव्हान दिल्याचे बोलले जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...