आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nashik Police Commissioner Action On Illegal Work

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस आयुक्तांहाती दंडा; अवैध मद्य विक्रीला चाप, गुन्हेगारांची यादी तयार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यात पोलिस दलास येत असलेले अपयश धुवून काढण्यासाठी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. दोन दिवसांपासून आयुक्तांसह सर्व अधिकारी रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. पोलिस आयुक्त सक्रिय झाल्याने इतर अधिकाऱ्यांना काम करताना हुरूप आला आहे. टवाळखोरांसह रात्री उशिरा सुरू असणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांवर धडाकेबाज कारवाई सुरू करण्यात आली आहे.

शहरात गुन्ह्यांचे प्रमाण रोखण्यास पोलिस आयुक्तांना अपयश येत असल्याने टीकेचे धनी व्हावे लागले होते. पोलिस अधिकाऱ्यांना गुन्हे रोखण्यास अपयश येत होते. पोलिस आयुक्त सिंहस्थाच्या बैठका आणि नियोजनात व्यस्त असल्याने अधिकाऱ्यांना पुरेशा सूचना देता येत नव्हत्या. दोन दिवसांपासून पोलिस आयुक्त रात्री आठनंतर गस्तीवर भर पोलिसअधिकारी आणि कर्मचारी पायी गस्त करण्यावर सर्वाधिक भर देणार अाहेत. महिला अधिकाऱ्यांना महिलांशी संवाद साधण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सहकार्य आवश्यक
गुन्हेरोखण्यासाठी पोलिसिंगमध्ये बदल केले जात आहेत. यामध्ये नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.
- एस.जगन्नाथन, पोलिस आयुक्त

अधिकाऱ्यांना अल्टिमेटम‌्...
कर्तव्यातकसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. सातपूर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांची बदली करण्यात आली असल्याने इतर अधिकाऱ्यांनीही या कारवाईचा धसका घेत काम करण्यास सुरुवात केली आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत.

अशी होणार कारवाई
पोलिसआयुक्तांसह सर्व अधिकारी, कर्मचारी रात्री वाजेनंतर शहरातील रस्त्यावर, झोपडपट्टी भागात अचानक कोम्बिंग, नाकेबंदी, ट्रिपल सीट कारवाई, मद्यपींवर कडक कारवाई, त्याचप्रमाणे रात्री बारानंतर सर्वच वाहनधारकांसह पादचाऱ्याची होणार चौकशी. हत्यारे विक्री करणाऱ्यांवर कारवाई, अवैध मद्य विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई. रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरणाऱ्या टवाळखोरांवर कडक कारवाई. रोज ऑल आउट कारवाई.