आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारांशी संबंधाच्या संशयावरून हवालदाराचे निलंबन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून विविध मोहिमा राबविल्या जात असतानाच पोलिसांची अंतर्गत माहिती गुन्हेगारांना पुरविल्याच्या संशयावरून मुख्यालयातील पोलिस हवालदार महेंद्र बैरागी यास निलंबित करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या आदेशानुसारच निलंबन झाल्याचे वृत्त आहे.

आंनदवल्लीत मोहन चांगले व दीपक सोनवणे हत्येच्या घटनेनंतर शहरातील टोळीयुद्ध चव्हाट्यावर आले. यापाठोपाठ पोलिस दलातीलच काही कर्मचारी गुन्हेगारी टोळक्यांशी संबंध ठेवत असल्याने त्यांना अंतर्गत माहिती मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

याच प्रकरणात आयुक्तांनी सहायक पोलिस आयुक्तांना संबंधित पोलिस कर्मचार्‍यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये एका उपनिरीक्षकासह दोघा कर्मचार्‍यांचा समावेश होता. यात पोलिस मुख्यालयातील हवालदार व न्यायालयात कर्तव्य बजावणार्‍या महेंद्र ऊर्फ मुन्ना बैरागी यास निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, प्रत्येक पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील अधिकारी-कर्मचार्‍यांवरही प्रशासनाची नजर असून, गुन्हेगारांशी संबंध अथवा त्यांची कुठल्याही प्रकरणात मदत केल्याचे आढळून आल्यास अशीच कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.