आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: दारू दुकानास विरोध केल्याने रहिवाशांनाच पोलिसांची नोटीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हाधिकाऱ्यांना दारू दुकानाला विराेध करणारे निवेदन देताना नवीन तिडके काॅलनीतील लंबाेदर अपार्टमेंटमधील रहिवासी. - Divya Marathi
जिल्हाधिकाऱ्यांना दारू दुकानाला विराेध करणारे निवेदन देताना नवीन तिडके काॅलनीतील लंबाेदर अपार्टमेंटमधील रहिवासी.
नाशिक- नवीन तिडके कॉलनीत वाणिज्य गाळ्यात तरुण सुखवाणी या व्यावसायिकाकडून सुरू करण्यात येणाऱ्या दारू दुकानास या भागातील रहिवाशांनी विरोध करत जिल्हाधिकारी पाेलिस अायुक्तांना याबाबत निवेदन दिले. असे असताना मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनी या रहिवाशांनाच नाेटीस काढत दारू दुकानास विरोध करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे रहिवाशांमध्येच भीती पसरल्याने त्यांनी लगेचच जिल्हाधिकाऱ्यांना दुसऱ्यांदा निवेदन देत अापला विराेध कायम ठेवला. 
 
नवीन तिडके कॉलनीत लंबाेदर आपर्टमेंटमध्ये दारू दुकान सुरू होणार असल्याची माहिती अपार्टमेंटमधील रहिवाशांना मिळाली. येथील रहिवाशांनी घर घेतेवेळी दारूविक्री अथवा कुठल्याही प्रकारच्या अवैध धंद्यासाठी परवानगी दिली जाणार नसल्याचा करार बांधकाम व्यावसायिकांशी केलेल्या खरेदीखतातच केला आहे. शिवाय अपार्टमेंटच्या एका बाजूला श्रीगणेशाचे मंदिरही आहे. 
 
तेथे नित्यनियमाने पूजा केली जाते. संपूर्ण परिसरात अत्यंत धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण आहे. परंतु, दारू दुकानामुळे ही संपूर्ण धार्मिकता भंग पावणार असून, लहान मुले, तरुण मुलींसह युवकांवरही त्याचा विपरीत परिणाम होणार असल्याने त्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी पंधरा दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती.
 
 पोलिस आयुक्तांनाही याबाबत निवेदन दिले होते. परंतु, आता झाले असे की, पोलिसांकडूनच या रहिवशांना नोटीस बजावण्यात अाली असून त्यात धमकीवजा समज दिली अाहे. त्यामुळे रहिवाशांमध्येही तीव्र भीती आणि नाराजी पसरली आहे. पोलिसच जणू दारूविक्री करण्याचे समर्थन करत असल्याचेही यातून स्पष्ट होत असल्याचा आरोप करत रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दुसऱ्या निवेदनात तक्रार केली.
 
 हे दुकान सुरू करू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. या निवेदनावर संदीन पाटील, अालाेक भंडारी, अरुण पाटील, एस. एस. तळवे, एस. सी. नेरे रश्मी भटानी, कल्पना पाटील, सुषमा पाटील, समृद्धी पाटील, स्मिता तळवे अादींची स्वाक्षरी अाहे. यावेळी म्हाडाचे मुख्याधिकारी रमेश मिसाळ, निवडणूक शाखा उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ यांच्यासह रहिवासी उपस्थित होते. 
 
बातम्या आणखी आहेत...