आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र - नाशकात पकडला 24 टन मासाचा ट्रक, 7 जणांविरोधात गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकमधे तमिळनाडुहून अवैधपणे जनावरांचे मांस व कातडी घेऊन येणाऱ्या ट्रकला नाशिक पोलिसांनी पकडले आहे. या ट्रकमध्ये असलेली कातडी ही गायीची असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र ही कातडी बैल व म्हशीची असल्याचा खुलासा वाहतूक करणाऱ्या व्यापाऱ्यांनी केला आहे.
ट्रकमधून 24 टनाचे मांस जप्त करण्यात आले आहे. तमिळनाडूच्या व्यापाऱ्यांसह नाशिकच्या सात जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सिन्नरहून नाशिकमध्ये येत असलेल्‍या एका ट्रकमधून दुर्गंधी येत असल्याचे काहींच्‍या लक्षात आले. त्यानंतर या ट्रकमध्ये गोमांस असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. चौकशीनंतर ट्रकमध्‍ये 24 टन मास व जनावरांची कातडी असल्‍याचे समोर आले. मात्र या वाहतूकीचा चालकाकडे परवाना नसल्‍याचे या प्रकरणी चालकासह नाशिकमधील सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्‍यात आला. त्‍यांना अटकही करण्‍यात आले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, महाराष्‍ट्र एक्‍सप्रेस लुटण्‍याचा प्रयत्‍न.., पृथ्वीराज चव्हाण यांचा राष्ट्रवादीवर निशाणा..,भाईंदरमध्ये चिमुकलीचा बसखाली चिरडून मृत्यू..