आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभारींच्या अनुपस्थितीने प्रतिकाँग्रेसचा हिरमोड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कॉँग्रेस शहराध्यक्ष अँड. आकाश छाजेड यांना हटविण्यासाठी पुढाकार घेणार्‍या समांतर कॉँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी पक्षाचे प्रभारी अँड. गणेश पाटील यांच्या उपस्थितीत होणार्‍या बैठकीत त्यांना धारेवर धरत निषेध नोंदविण्याची आखलेली रणनीती त्यांच्या अनुपस्थितीने अमलात आणताच आली नाही. त्यामुळे छाजेडविरोधी गटाचा हिरमोड झाला.

छाजेडविरोधी गटाने समांतर कॉँग्रेस स्थापून त्याद्वारे कार्यक्रम राबविण्याचा धडाका लावला होता. मात्र, पक्षर्शेष्ठींनी त्याची दखलच घेतली नाही. पक्षाचे प्रभारी अँड. पाटील यांच्याकडेही पक्षर्शेष्ठींकडे अहवाल पोहोचविण्याची मागणी या गटाने केली; मात्र अँड. पाटील यांनी या मंडळींना वेळच दिला नसल्याचे सांगण्यात आले. आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी पाटील रविवारी जिल्हा व शहर पदाधिकार्‍यांच्या बैठकीसाठी उपस्थित राहणार होते.

येणे टाळल्याचा दावा
या बैठकीत समांतर कॉँग्रेसच्या नेत्यांकडून बहिष्कार टाकून अँड. पाटील यांना कोंडीत पकडण्याची रणनीती आखली होती. मात्र, ते अनुपस्थित राहिल्याने नाराज गटाकडून प्रतिकॉँग्रेसच्या विरोधाच्या भीतीनेच त्यांनी येणे टाळल्याचा दावा करण्यात आला.