आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेस कामगारांची ‘ग्रेड पे’ तफावत दूर, नोव्हेंबर 2008 पासून मिळणार फरकाचा लाभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - इंडिया सिक्युरिटी व करन्सी नोट प्रेसमधील कामगारांच्या पाचव्या वेतन आयोगातील ग्रेड पेमधील तफावत दूर करून प्रेस महामंडळाने नवीन योजनेला मंजुरी दिली. यामुळे दोन्ही प्रेसमधील 80 टक्के कामगारांना याचा आर्थिक फायदा होणार आहे.
या निर्णयाचा लाभ 1 नोव्हेंबर 2008 पासून होणार आहे. दोन्ही प्रेसमधील कंट्रोल, टेक्निकल व वर्कशॉप विभागातील कामगारांना ग्रेड पेच्या तफावतीची रक्कम मिळणार असल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
याबाबत प्रेस मजदूर संघाने पाठपुरावा सुरू ठेवला होता. दोन दिवसांपूर्वी नवी दिल्लीत महामंडळाचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर एम. एस. राणा, संचालक डॉ. मनोरंजन दास व पी. एन. राडकर यांच्यासमवेतच्या बैठकीत ड्राफ्ट अँग्रिमेंट बोर्डापुढे ठेवण्यात आले. मजदूर संघाचे कार्याध्यक्ष जगदीश गोडसे, इपीएफ ट्रस्टी ज्ञानेश्वर जुंद्रे, सुनील आहिरे हे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. याच बैठकीत ग्रेड पे पॉलिसीला मंजुरी देण्यात आली.
कामगारांच्या ‘ग्रेड पे’मध्ये होणार असा बदल
ग्रेड पेमधील तफावत दूर झाल्याने 1800 रुपये ग्रेड पे असलेले कामगार आता 1900 रुपये ग्रेड पेमध्ये आले आहेत. ज्या कामगारांची ग्रेड 1800 रुपये आहे; परंतु त्यांची सेवा 20 वर्षे झाली आहे, त्यांना थेट दोन हजार रुपयांची ग्रेड पेची मूळ पदाची ग्रेड देण्यात आली आहे. नंतरच्या बढतीत त्यांना थेट 2400 रुपये ग्रेड पे मिळणार आहे. मूळ ग्रेड 1900 रुपये असलेले कामगार 2400 रुपये ग्रेड पेमध्ये, 2400 रुपये ग्रेड पे असलेले 2800 रुपये ग्रेड पेमध्ये, तर 2800 रुपये ग्रेड पेमधील कामगार 4200 रुपये ग्रेड पेमध्ये जातील.