आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चौपदरीकरणात लाटले दुपटीने; भूसंपादन मोबदल्यासाठी ‘महामार्ग’ला पत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिक-पुणे महामार्ग चौपदरीकरणात येणार्‍या महापालिका हद्दीतील मिळकती ताब्यात घेताना त्याचा मोबदला संबंधित मिळकतधारकांना दिला जात असून, यापैकी अनेकांनी दोनवेळा लाभ लाटल्याचेही उघड झाले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यासंदर्भात हरकत घेत मिळकतींचा मोबदला महापालिकेला मिळावा, असे पत्र महापालिका प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठविले आहे.
नाशिक-पुणे महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला हिरवा कंदील मिळाल्याने त्याअंतर्गत येणार्‍या मिळकती ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेस वेग आला आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून संबंधित मिळकतधारकांना नोटीस देऊन मिळकती ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. महापालिका हद्दीतही 200 मिळकती या रस्त्याच्या चौपदरीकरणाअंतर्गत येत असल्याने संबंधित मिळकतधारकांनाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नोटीस देऊन त्याबदल्यात रेडीरेकनरनुसार मोबदला देण्याविषयी कळविले आहे. या नोटीसमुळे अनेक मिळकतधारक अगदी खुश झाले आहेत. कारण यापैकी अनेकांना तर यापूर्वीच पालिकेकडून टीडीआर व एफएसआयचा लाभ मिळालेला आहे. असे असताना महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातही मोबदला मिळणार असल्याने एकप्रकारे गैरप्रकारच घडत असून, त्याबाबत पालिकेलादेखील अंधारात ठेवले जात आहे. ही बाब महापालिकेच्या निदर्शनास येताच नगररचना विभाग आणि मिळकत विभागाने त्यास हरकत घेत प्राधिकरणाला भूसंपादनाचा मोबदला महापालिकेला मिळावा, अशी सूचना केली आहे.