आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशभरातील स्वच्छ रेल्वे स्थानकांमध्ये नाशिकरोड स्थानकाचा पाचवा क्रमांक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. त्यामुळे देशात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असल्याने काहीअंशी तरी स्वच्छता वाढली आहे. रेल्वे मंत्रालयाने एका खासगी संस्थेच्या माध्यमातून स्वच्छ रेल्वे स्थानकांचे सर्वेक्षण केले. यामध्ये देशातील एकूण ३५० रेल्वे स्थानकांचा सर्व्हे करण्यात आला. स्वच्छ स्थानक म्हणून नाशिकरोड स्थानकाचा पहिला दहामध्ये क्रमांक लागल्याने नाशिककरांसाठी ही अभिमानाची बाब ठरत आहे. तर, वर्ग प्लसमध्ये सोलापूर आणि मुंबई सेंटरचा क्रमांक लागला आहे.
नाशिकरोड रेल्वे स्थानकामध्ये यंत्राद्वारे स्वच्छता करण्यात येते. यामध्ये सुरुवातीला पाण्याने स्वच्छ करून त्वरित सुके करण्यात येते. त्याचप्रमाणे स्थानकांच्या भिंती आणि पत्र्यांना पावसामुळे पडणारे डाग स्वच्छ करण्यात येतात. व्हॅक्यूम क्लीनरचा वापर करण्यात येत असल्याने ठिकठिकाणी डस्टबिन ठेवण्यात आले आहेत. स्थानकामध्ये खाद्यपदार्थांचा अधिक वापर होत असल्याने माशांचा उपद्रव होत असतो. स्थानकात माशा होऊ नये म्हणून दोन्ही प्लॅटफॉर्मवर १५ फ्लायकॅचर बसविण्यात आलेले आहेत. रेल्वे ट्रॅक स्वच्छ ठेवण्यासाठी २६ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. या कर्मचाऱ्यांना गमबूट, ग्लोज, चमकणारे जॅकेट देऊन स्वच्छतेसाठी ब्लिचिंग पावडर, फिनाइल आदी
औषधांचा वापर केला जातो.

नाशिकरोड रेल्वेस्थानक पहिल्या दहामध्ये आल्याने कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. यामध्ये रेल्वे कर्मचारी आणि नाशिककरांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. परंतु, भविष्यात नाशिकरोड रेल्वे स्थानक कसे प्रथम क्रमांकावर असेल, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. - एम. बी. सक्सेना, स्टेशनप्रबधंक, नाशिकरोड

रेल्वे स्थानकाचा ३५० स्थानकांमध्ये पहिल्या दहामध्ये नंबर लागल्याने आनंददायी बाब आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी यामध्ये कायम सातत्य राखण्याची गरज आहे. - राजेश फोकणे, सदस्य,रेल्वे सल्लागार समिती

स्थानक स्वच्छतेसाठी स्थानकामध्ये येणाऱ्या नागरिकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. नाशिककरांची मानसिकता चांगली असल्याने स्थानकामध्ये स्वच्छतेसाठी स्वत: पुढाकार घेतात. - जुबेर पठाण, वरिष्ठ निरीक्षक

वायफाय आणि एस्केलेटरच्या यादीतही समावेश
नरेंद्रमोदी यांनी रेल्वे स्थानक हे वायफाययुक्त करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानुसार नाशिकरोड स्थानक वायफाय आणि एस्केलेटर (सरकता जिना) याच्या यादीत असल्याने त्याचेही काम लवकर होणार असल्याचे रेल्वेच्या विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...