आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Railway Station Reservation Counter Issue

तत्काळ आरक्षण केंद्र तासभर आधी उघडा, रेल्वे महाप्रबंधकांनी दिले आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - रेल्वेच्या तत्काळ आरक्षणामध्ये दलालांना रेल्वे आणि पोलिस कर्मचारी मदत करीत असल्याचा ‘दिव्य मराठी’ ने लाइव्ह रिपोर्ट शुक्रवारी दिला होता. त्याची दखल घेऊन मध्य रेल्वेचे महाप्रंबधक बी. आर. खरे यांनी अधिकार्‍यांची कानउघाडणी केली व तत्काळ आरक्षणात पारदर्शकता आणून आरक्षण केंद्र नियमित वेळेपेक्षा एक तास अगोदर म्हणजे सकाळी 7 वाजता उघडण्याचे आदेश दिले.

‘दिव्य मराठी’ने नाशिकरोड स्थानकावर तत्काळ आरक्षण केंद्रामध्ये दलालांच्या घुसखोरीमुळे प्रवाशांना तत्काळ आरक्षण मिळत नसल्याचे वृत्त प्रसिद्ध करताच त्याची दखल घेत महाप्रबंधक खरे यांनी शुक्रवारी केंद्राची पाहणी करून कामकाजाची माहिती घेतली. या वेळी तत्काळ आरक्षण मिळत नसल्याने अधिक पारदर्शकता त्वरित आणावी असे रेल्वेच्या भुसावळ विभागाचे मंडल रेल्वे प्रबंधक महेश गुप्ता, वाणिज्य विभागाचे एन. जी. बोरीकर, नाशिकरोड रेल्वे स्थानक प्रबंधक एम. बी. सक्सेना यांना आदेश दिले. खरेंनी स्थानकातील विविध बाबींची चौकशी केली.