आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुजबळ समर्थकांना भाजप नेत्यांचेच बळ? नाशिकमध्ये अाज माेर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी अन्याय केल्याची भावना ओबीसी समाजापर्यंत जावी, अशी भुजबळांच्या समता परिषदेची सुरुवातीपासून इच्छा होती. पण त्याला मुहूर्त सापडत नव्हता. मात्र, सध्या राज्यभर िनघणाऱ्या मराठा मोर्चाच्या प्रभावामुळे असे मोर्चे काढले तर त्याचा प्रभाव पडेल, या अपेक्षेने नाशिकला ओबीसींचा मोर्चा ३ ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे. िवशेष म्हणजे भाजपच्या बड्या नेत्यांचा या मोर्चाला पाठिंबा असल्याचे सूत्रांनी सांगितले.

फडणवीस यांच्या कारभारामुळे नाराज असलेले एकनाथ खडसे तसेच पंकजा मुंडे यांचा या मोर्चाला पाठिंबा असल्याचे बोलले जाते. हे नेते मोर्चात उघडपणे सामील होणार नसले तरी या नेत्यांना तसेच दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मोठा समर्थक वर्ग या मोर्चात सहभागी होणार असल्याचे समजते. मुंडे, खडसे व पंकजा यांची छायाचित्रे मोर्चासाठी लावलेल्या पाेस्टर्सवर लावण्यात आली आहेत. या मोर्चाची जोरदार तयारी झाली असून नाशिक शहरात लावण्यात आलेल्या पोस्टरवर ही छायाचित्रे िदसत आहेत. मात्र, हा कोणत्या पक्षाचा नसून ओबीसी आणि त्यांच्या नेत्यांचा मोर्चा असल्याची भूमिका आमदार पंकज भुजबळ यांनी मांडली आहे. शिवाय हा मोर्चा शांततेत व्हावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

भुजबळांना अटक झाल्यानंतर ते एकटे पडले होते. सुरुवातीला शरद पवार साेडून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली खरी, पण त्यांच्या सुटकेचे िचत्र अंधूक होताच या नेत्यांनी पाठ फिरवली. मात्र, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी जे. जे. रुग्णालयात अाजारी भुजबळांची भेट घेतल्यानंतर िचत्र बदलायला सुरुवात झाली. िवशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेतेही भुजबळांच्या भेटीला धावले. याच वेळी ओबीसी समाजाच्या मोर्चाची घोषणाही करण्यात आली. नाशिकमधील मोर्चाच्या निमित्ताने भुजबळ समर्थक मोठे शक्तिप्रदर्शन करणार हे निश्चित आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसची किती साथ असेल हे सांगता येत नाही; पण भाजपमधील बहुजन वर्ग मोठ्या संख्येने या मोर्चाला येणार आहे, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी िदली. खडसे व पंकजा यांच्यासह राम िशंदे यांचेही समर्थक या मोर्चात ओबीसी म्हणून सहभागी होतील, असे चित्र निर्माण करण्यात आले आहे.

पवारांनी लावली टाचणी
गोपीनाथ मुंडे व भुजबळ यांचे संबंध राज्याने पाहिले आहेत. ओबीसीच्या मुद्द्यावर हे दोघे एकत्र होते. भुजबळांच्या भरारीच्या काळात समता परिषदेचे कामही वेगात असताना मुंडे व भुजबळ ही युती राज्याच्या राजकारणाला एक वेगळी िदशा देईल, असे चित्र निर्माण झाले होते. पण समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळ हे राष्ट्रीय नेते होत आहेत, असे िदसताच शरद पवार यांनी त्यांच्या महत्त्वाकांक्षेला टाच लावली आणि समता परिषदेची वेगाने सुरू झालेली घोडदौड थांबली.

मोर्चानिमित्त ताकदीचा प्रयोग
भुजबळ तुरुंगातच असल्याने आेबीसी चळवळ पूर्ण थंडावली आहे. भुजबळ व पंकजा यांच्या भेटीने ही चळवळ पुन्हा एकदा िजवंत होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. आेबीसी संघटनेच्या माध्यमातून भुजबळांना राष्ट्रवादीला, तर पंकजा यांना भाजपला आपली ताकद दाखवून द्यायची आहे. आगामी ओबीसी मोर्चा हे एक िनमित्त ठरणार आहे.
बातम्या आणखी आहेत...