आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काकस्पर्शावरून नाशकात दोन कुटुंबे पोलिस ठाण्यात!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- काकस्पर्श होण्यासाठी ठेवण्यात आलेल्या घासावर टाकलेले मद्य दुसर्‍या व्यक्तीच्या पिंडाजवळ गेल्याने दोन कुटुंबीयांमध्ये झालेला वाद थेट नाशिक पोलिस ठाण्यात गेला. त्यानंतर पोलिस आणि काही नागरिकांच्या मध्यस्थीने वाद मिटवला. मात्र, या विनोदी प्रकाराने घाटावर जमलेल्या सर्वांचीच चांगलीच करमणूक झाली.

काकस्पर्श व्हावा यासाठी एका मृताच्या कुटुंबीयांनी ठेवलेल्या घासावर दारूची बाटली आडवी केली. मात्र, असे करताना मद्याचा ओघळ दुसर्‍या पिंडाच्या घासावर गेला. याचा राग आल्याने दुसर्‍या कुटुंबाने हरकत घेतली. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये प्रचंड वाद झाला. मद्याच्या ओघळामुळे आमच्या वडिलांच्या घासाला कावळा शिवला नाही, असे एका परिवाराचे म्हणणे होते. तर आमच्या वडिलांना मद्याचे व्यसन होते, आम्ही त्यांची इच्छा पूर्ण केली, असे दुसर्‍या कुटुंबाचे म्हणणे होते. या प्रकारामुळे पोलिसांनाही कोणाविरुद्ध काय दाखल करावे, असा प्रश्न पडला होता. त्यानंतर काही वेळाने पिडांना काकस्पर्श झाला.