आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सक्तीचे लाेडशेडिंग केल्यास नाशिककर दाखवणार ‘पाणी’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महानगरात पंपांनी हाेणारी पाणीचाेरी राेखण्यासाठी महापालिका प्रशासनाने उफराटा निर्णय घेत वीज मंडळाला त्या काळात सक्तीचे ‘लाेडशेडिंग’ करण्यास सांगण्याच्या निर्णयाविराेधात बहुतांश नाशिककरांनी अाव्हान देण्याचा पवित्रा स्वीकारला अाहे. पालिकेच्या नळातून येणारे पाणी खेचण्यासाठी वापरले जाणारे वीजपंप जप्त करण्यातील अापले अपयश लपवण्यासाठी सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही देण्यात अाला.

पालिका हद्दीतील पाणीपुरवठ्याचे संकट अधिकच गडद हाेऊ लागल्याचे प्रशासनाच्या लक्षात येण्यास उशीरच झाला अाहे. त्यामुळे अाता नाशिककरांनी कधीही अनुभवलेले जलसंकट तर सहन करावे लागत असून, त्याचबराेबर नजीकच्या भविष्यात सक्तीचे भारनियमन नागरिकांना सहन करावे लागण्याचे संकेत पालिका अायुक्तांनी बुधवारी देताच अशा अजब निर्णयाविराेधात गुरुवारपासूनच नाशिककरांचा अावाज संघटित हाेऊ लागला अाहे. वीज जाण्याच्या शक्यतेने संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या अाहेत.

अायुक्तांसह वीज कंपनीस नाहीत निर्णयाचे अधिकार
किती वीज उपलब्ध अाहे, काेणत्या वेळेत भारनियमन करायला हवे याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार वीज नियामक अायाेगालाच अाहेत. त्यामुळे अायुक्तांनी वीज कंपनीला साकडे घालूनही असा निर्णय हाेऊच शकत नाही. त्यापेक्षा पाणीचाेरी करणाऱ्यांच्या विराेधात धडक माेहीम राबविण्याची आवश्यकता आहे. -सिद्धार्थ साेनी, सचिव,वीजग्राहक समिती

लाेडशेडिंग लादणे हा बिनडाेकपणाचा कहर
पाणीचाेरीची मूळ समस्या साेडवता येत नाही म्हणून सामान्य नागरिकांवर लाेडशेडिंग लादणे हा बिनडाेकपणाचा कहर अाहे. १० हजार कनेक्शनधारकांपैकी १० किंवा १०० जण जर पाणीचाेरी करत असतील तर त्या पाणीचाेरांवर कारवाई करण्याएेवजी १० हजार जणांना वेठीस धरल्यास त्या निर्णयाला अाव्हान दिले जाईल. -मेजर पी. एम. भगत, सदस्य,ग्राहक पंचायत

महापालिकेने आधी स्वत:ची जबाबदारी पार पाडावी
नागरिकांकडून जबाबदारीची अपेक्षा बाळगणाऱ्या महापालिका प्रशासनाने त्यांची जबाबदारी पार पाडली जात अाहे की नाही, याचा विचार करावा. प्रशासनाने पाण्याचा दुरुपयाेग थांबविण्याचे सर्व प्रयत्न केले असल्याची सामान्यांची खात्री करून द्यावी. मगच त्यांनी वीजभारनियमनाच्या मुद्याला हात घालावा. -प्रा. दिलीप फडके, सचिव,ग्राहक पंचायत

अाग रामेश्वरी अन् बंब साेमेश्वरी...
पाणी चाेरी करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून सर्वांनाच ‘लाेडशेडिंग’चा परिणाम भाेगायला लावणे हा ‘अाग रामेश्वरी अन् बंब साेमेश्वरी’सारखा प्रकार अाहे. महापालिकेने पाणीचाेरी करणाऱ्यांंचे पंप कायमस्वरूपी जप्त करण्यासाठी यंत्रणा राबवावी. पुरेसे पाणी द्यायचे साेडून जनतेला अाराेपीच्या पिंजऱ्यात उभे करू नये. -अजय बाेरस्ते, महापालिका गटनेता, शिवसेना
बातम्या आणखी आहेत...