आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक जिल्ह्यात पुन्हा ताेडफाेड, जाळपाेळ; दसऱ्याच्या सणाला गालबाेट, तणावाचे सावट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तळेगाव-अंजनेरी येथील पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे गेले दाेन दिवसांपासून धुमसत असलेले वातावरण मंगळवारी काहीसे शांत झाल्यासारखे वाटत असतानाच नाशिक जिल्ह्यात पुन्हा जमावाने हिंसाचार घडवून अाणत दसऱ्याच्या सणाला गालबाेट लावले. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पाथर्डी फाटा लेखानगर भागात अज्ञात लाेकांनी वाहनाची ताेडफाेड केली. तर सिडकाे भागातही काही वाहनांची जाळपाेळ माेडताेड झाल्याच्या घटनांबाबत चर्चा सुरू हाेती. पाेलिस राखीव दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन समाजकंटकांना ताब्यात घेतले.
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास नाशिक- मुंबई महामार्गावरील गरवारे चाैकात काही तरुणांनी गाड्या फोडल्याने वातावरण चिघळले. त्याचवेळी त्र्यंबकेश्वर परिसरातील महिरावणी आणि अंजनेरी येथे दोन गट समोरासमोर आले. त्यामुळे समर्थकांमध्ये जाेरदार घाेषणाबाजी सुरू झाली. त्यात अचानक दगडफेक झाल्याने सुमारे १५ ते २० दुचाकी पाच कार, टेम्पाेची ताेडफाेड करण्यात अाली. काही दुचाकीही पेटविण्यात अाल्याने तणाव वाढला. अंजनेरीजवळही रात्री एसटीवर दगडफेक करण्यात अाली. यात एक प्रवासी महिला जखमी झाली. पाेलिसांनी त्र्यंबककडे जाणारी सर्व वाहने राेखली. तर, त्र्यंबककडून नाशिककडे येणारी वाहतूक थांबविण्यात अाली.
इंटरनेटसेवा बंदच : वातावरणचिघळत असल्यामुळे दाेन दिवसांपासून नाशिक शहरासह त्र्यंबेकश्वर तालुक्यात साेमवारी सकाळपासून बंद केलेली माेबाइल इंटरनेट अाणि बल्क मेसेजची सेवा मंगळवारीही बंदच हाेती.
गय केली जाणार नाही
^शहरातशांततासलाेखा प्रस्थापित हाेत असताना रॅली, माेर्चा अथवा निदर्शनांच्या माध्यमातून जमावाला एकत्र करणे, फूस लावणे असे प्रकार घडले तर त्यास जबाबदार असणाऱ्यांचा शाेध घेऊन त्यांच्यावर कठाेर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यात लाेकप्रतिनिधी असाे की कुठल्याही राजकीय पक्षांचा नेता, कार्यकर्ता. कुणाचीही गय केली जाणार नाही.
- रवींद्रकुमारसिंघल, पाेलिस अायुक्त
बातम्या आणखी आहेत...