आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच कुटुंबातील तिघे अपघातात ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिंडोरी (जि. नाशिक) - वणी-सापुतारा मार्गावर चौसाळे येथे कार व ट्रकमध्ये झालेल्या अपघातात बलसाड येथील एकाच कुटुंबातील तिघे ठार, तर सात जण जखमी झाले आहेत. गुरुवारी सकाळी आठला हा अपघात घडला.

सापुतार्‍याकडे जाणारा ट्रक (एमएच 14, पीपी 4255) व नाशिककडे येणारी शेवरले कारची (जीजे 21, एएच 3715) समोरासमोर धडक झाली. यात कारचालक धीरूभाई बाबूभाई पटेल (40) व बाबूभाई छन्नाभाई पटेल (61) यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी पुष्पाबेन बाबूभाई पटेल (55) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रियांश कल्पेश पटेल (7 महिने), क्रिशा भारतभाई पटेल (6), पिनल कल्पेश पटेल (21), नीरव दयाजी पटेल (24), मित्तल दयाजी पटेल (30), कल्पेश बाबूभाई पटेल (30) व दयाजी छोटूभाई पटेल (55) जखमी झाले.