आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

का पडतात रस्त्यांवर खड्डे? गुणवत्ता नियंत्रणाकडेही जरा लक्ष द्या!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडणे ही बाब म्हणजे प्रशासनाचे अपयश असून, लोकप्रतिनिधींचा प्रशासनावरील दबदबा कमी होत असल्यामुळेच अशा गोष्टी घडतात, असा सूर ‘दिव्य मराठी’च्या राउंड टेबलमधून व्यक्त झाला. गुणवत्ता नियंत्रण अधिकार्‍यांनी आपल्या जबाबदारीशी प्रामाणिक राहून काम केल्यास रस्त्यांना खड्डे पडणारच नाहीत, असे या वेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले. ‘शहरातील रस्त्यांवरील खड्डे’ या विषयावर ‘दिव्य मराठी’ने सोमवारी राउंड टेबल चर्चासत्राचे आयोजन केले होते. या वेळी उपस्थित नगरसेवकांनी प्रशासनावर, तर सामान्य नागरिकांच्या प्रतिनिधींनी लोकप्रतिनिधी व प्रशासन या दोघांवर दोषारोप केले. लोकप्रतिनिधी, प्रशासन, शहरातील नामांकित व्यक्ती आणि सामान्य नागरिकांनी एकत्र येऊन या समस्येची सोडवणूक करण्याची गरज ‘राउंड टेबल’मधून व्यक्त झाली.

का पडतात रस्त्यांवर खड्डे?

0 रस्त्यांवरील पाण्याचा निचरा होत नाही

0 रस्त्यांचे बांधकाम करताना सदोष सामग्रीचा वापर

0 रस्त्यांचा मुळात पायाच कच्च असतो

0 रस्त्यांचे डिझाईन सदोष असल्याने खड्डे पडतात

0 क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक

0 डांबर आणि सिमेंटच्या मुबलक प्रमाणाचा अभाव.

यासाठी असे करावे उपाय

> रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी वाहून जाण्यासाठी गटार असावी.

पाणी आणि डांबर एकमेकांच्या विरोधात असल्याने रस्त्यांचे सिलकोट व्यवस्थित असावे.

> पावसाळ्यात खड्डे बुजविताना पावसाळी डांबराचाच वापर झाला पाहिजे. पावसाळ्यात हॉटमिक्स डांबराचा वापर न करता पाऊस उघडल्यानंतर कोल्डमिक्स पद्धतीने भरल्यास दीर्घकाळ टिकेल.

> जमिनीचा प्रकार पाहून जीओ टेक्सटाइल्स टेक्नोलॉजी आली असून, तिचा वापर केला पाहिजे. यामुळे तळातील पाणी वर येऊ न देता तो रस्ता दीर्घकाळ टिकू शकतो.

> बेकंलमन बीम डिझाईन व सीबीआर (कॅलिफोर्निया बेरिंग रेशो) या पद्धतीने रस्त्याचे डिझाईन केल्यास योग्य पद्धतीने रस्ता निश्चित होतो.

> अवजड वाहनांची संख्या आणि भविष्यात अजून पंधरा ते वीस वर्षांनी वाढणारी संख्या लक्षात घेऊन तसेच मल्टिअँक्सल वाहनांची संख्या लक्षात घेऊन रस्ते बनविले पाहिजेत.

स्थायी सभापती म्हणतात

0 मनसेने खड्डे पाडले का?

0 शिवसेनेच्या काळातही खड्डे पडले

0 मनसेला कोंडीत पकडण्यासाठी सेनेच्या उड्या

0 नाशकात आम्ही मग मुंबईतील खड्डय़ांना जबाबदार कोण?

0 गुणवत्ता नियंत्रण अधिकारी काय करतात?

विरोधी पक्षनेते म्हणतात

0 मनसेच्या काळातच सर्वाधिक खड्डय़ांचा पाऊस

0 सुस्थितीतील आयआरडीपी रस्ते सेनेच्या काळात झाले

0 डांबरीकरण व रिसर्फेसिंगची कामे यापूर्वीही मंजूर

0 गुणवत्ता नियंत्रण अधिकार्‍यांवर सत्ताधार्‍यांचा वचकच नाही