आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Road Railway Station Will Be Banned On Entry

सिंहस्थ काळात येणाऱ्या भाविकांना शहरात बंदी, परतीच्या भाविकांना प्रवेश बंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या लोंढ्यामुळे रामकुंड परिसरातील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी रेल्वेने येणाऱ्या भाविकांना शहरात प्रवेशास अटकाव करण्यात येणार आहे. अलाहाबाद येथे झालेल्या सिंहस्थ कुंभमेळा काळात तेथील रेल्वे स्थानकावर झालेली चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना टाळण्यासाठी नाशिकहून परतीच्या भाविकांना नाशिक रोड रेल्वे स्थानकावर प्रवेश बंदी करून त्यांची मालधक्क्यावर रवानगी करण्यात येणार आहे.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ऑगस्टमध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर इतर विभागांप्रमाणे रेल्वे विभागाने देखील सिंहस्थ आराखडा तयार केला आहे. सिंहस्थात देशभरातून शहरात येणाऱ्या भाविकांसाठी ठिकठिकाणावरून अकरा विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. विशेष गाड्या स्थानकावरील जुन्या एक ते तीन प्लॅटफार्मवर थांबवता नव्याने बनवण्यात येत असलेल्या चौथ्या प्लॅटफार्मवर थांबवल्या जातील.

शहरातील लोढ्यांचा ताण कमी करण्यासाठी उतरणाऱ्या भाविकांसाठी बाहेर पडण्यासाठीचे स्थानकाच्या नाशिकराेड बाजूकडील मुख्य प्रवेशद्वारासह इतर सर्व मार्ग बंद केले जाणार आहेत. त्यांना पूर्वेकडील सिन्नरफाटा बाजूला नव्याने उभारण्यात येणाऱ्या प्रवेशद्वारातून बाहेर पडण्याचा मार्ग खुला करून बिटकाेमार्गे दसक येथील गाेदावरी घाटावर स्नानासाठी सोडण्यात येणार आहे.त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांसाठी पूर्वेकडील मालधक्क्यासमाेरील माेकळ्या जागेत शहर बसची व्यवस्था केली जाणार आहे.
बॅरिकेट्सलावून मार्ग बंद करणार
स्थानकावरील चौथ्या प्लॅटफार्मवर उतरणारे भाविक पादचारी पुलावरून पहिल्या प्लॅटफार्मवरील नाशिक रोडकडील मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर जाऊ नयेत, म्हणून पादचारी पुलावर बॅरिकेट्स लावून पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

परतीच्या भाविकांना रेल्वे स्थानकावर प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. सिंहस्थ विशेष गाड्या नाशिक रोड स्थानकावरून सोडता मालधक्का येथून सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे नाशिक, त्र्यंबकेश्वर दसक येथून येणाऱ्या प्रवाशांना बिटकाेवर मार्गदर्शन, सूचना देऊन डाॅ. आंबेडकर पुतळा येथून सुभाष रोडमार्गे मालधक्क्याकडे साेडण्यात येणार आहे.
तिकिटांची तपासणी
रेल्वेस्थानकाच्या आवारात स्थानकावर प्रवेश करणाऱ्या प्रवाशांचे तिकिट तपासले जाणार आहे.तिकिटावरून सिंहस्थातील भाविक आहे की नियमित प्रवासी आहे, हे समजून घेऊन प्रवेश देण्याची यंत्रणा कार्यरत असणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक रोड, ओेढा, देवळाली कॅम्प मालधक्का येथे बंदोबस्तासाठी लोहमार्ग केंद्रीय रेल्वे सुरक्षा दलाचे १२०० अतिरिक्त पोलिस येणार आहेत. याशिवाय भाविकांच्या सुखकर प्रवासासाठी ३०० स्वयंसेवकांची मदत याप्रसंगी घेतली जाणार आहे.
पर्वणीच्या दिवशी गंगा गोदावरीत शाहीस्थान करून परतणाऱ्या भाविकांना बिटको चौकात अडवले जाणार आहे. परगावी, परराज्यात जाणाऱ्या भाविकांसाठी मालधक्का येथून रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली असल्याचे फलक, मार्गदर्शक तसेच लाउडस्पीकरवरून वारंवार सूचना देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच डॉ. आंबेडकर पुतळा येथून मालधक्क्याकडे जाणाऱ्या मार्गाचे फलक लावून पोलिस, स्वयंसेवकांच्या मदतीने भाविकांना मालधक्क्यावर सोडण्यात येणार आहे.