आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फीवाढीविरोधात चिमुकले, रासबिहारी शाळेच्या प्रस्तावाची फेरतपासणी करण्याची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - रासबिहारी शाळेच्या फीवाढ प्रस्तावाच्या मंजुरीत नियमांचे उल्लंघन झाले असून, या प्रस्तावाची फेरतपासणी करून फीवाढ रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शिक्षण बाजारीकरणविरोधी मंचतर्फे शनिवारी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर विद्यार्थी-पालकांचा मोर्चा काढण्यात आला.

शिवाजी पुतळा, मेनगेट मार्गे विभागीय कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर उपसंचालक आर. आर. मारवाडी यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, शासन, सर्वोच्च न्यायालय व शिक्षण विभागाचा अवमान करणारा हा निर्णय असून, नफेखोरीला प्रोत्साहन देणारा आहे. शाळेकडून होणार्‍या अन्यायाबाबत पालकांच्या भावना तीव्र असून, मागण्यांबाबत कार्यवाही करून अन्याय दूर करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

मंचचे अध्यक्ष र्शीधर देशपांडे, सचिव डॉ. मिलिंद वाघ, सदस्य मुकुंद दीक्षित, वासंती दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात दिनेश बकरे, भगवान जगताप, लीना बकरे, रतन सांगळे आदी सहभागी झाले होते.

आजी-आजोबा, नातू मोर्चात
विद्यार्थ्यांच्या पालकांसह आजी-आजोबा व नातूही सहभागी झाले होते. ज्युनिअर केजीमध्ये शिकणारे अडीच-तीन वर्षांचे विद्यार्थी भरउन्हात फीवाढीच्या विरोधात घोषणा देत होते. पायी चालून व घोषणाबाजीमुळे थकणार्‍या बालकांना पालक वेळोवेळी पाणी देत होते.

उच्चशिक्षण देणार कसे?
शाळेने अशाप्रकारे अचानक वाढवलेली फी भरण्याची आमची तयारीच नाही. प्राथमिक शिक्षणासाठीच एवढा पैसा लागत असेल तर पुढे उच्च् शिक्षणावर खर्च कसा करणार? वाढीव फी आम्ही भरूच शकत नाही. उज्ज्वला शिरसाठ, पालक

शाळेची मनमानी
सरकार शिक्षणाच्या समान अधिकाराची घोषणा करत असताना खासगी संस्था मनमानी करत आहेत. वाढीव फीमुळे दोन पाल्यांना शिक्षण देणे आम्हाला शक्यच नाही. सपना जैन, पालक

नफेखोरीला प्रोत्साहनच
शाळेने एकदम 3100 रुपये फी केली. शासन निर्णयानुसार ती 2600 होणार असली तरी हा प्रस्तावही आम्हाला मान्य नसून, एक हजार रुपयेच फी हवी. सुरेश देसले, विद्यार्थ्याचे आजोबा