आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Road Resident Gets Dirty Smell Water Supply

नाशिकरोडवासीयांना उग्र दर्पयुक्त पाण्‍याचा पुरवठा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - विभागात बुधवारी सकाळी महापालिकेकडून पुरवठा होणार्‍या पाण्याला उग्र दुर्गंधी येत असल्याने नागरिक संतप्त झाले. हे पाणी तोंडात घेताच अनेकांना मळमळ होऊन ओकारीची भावना झाली. अत्यंत उग्र दर्प असलेल्या या पाण्याचा दोन दिवसांपासून पुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली.

तांत्रिक अडचणीमुळे दुर्गंधीयुक्त पुरवठा झाल्याची समजूत करून घेऊन मंगळवारी नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले गेले. मात्र, बुधवारीही पाण्याला दुर्गंधी येऊ लागल्याने नगरसेवक व पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करण्यात आली. नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्रात दारणा धरणातील 45, तर गंगापूर धरणातील सात दशलक्ष घनफूट पाणी शुद्ध करून भीमनगर, मुक्तिधाम, दुर्गा उद्यान, पवारवाडी, शिवशक्तीनगर, गांधीनगर या टाक्यांच्या माध्यमातून त्यातील 42 दशलक्ष घनफूट पाणी वितरित केले जाते. जेलरोड, शिवाजीनगर, नारायणबापूनगर, सैलानीबाबानगर, राजराजेश्वरी परिसर, दसक-पंचक, हनुमंतनगर, एमएसइबी, ब्रrागिरी सोसायटी, गोदावरी सोसायटी, मयूर सोसायटी आदी भागात पाणीपुरवठा होत आहे. दूषित पाण्यामुळे पोटाच्या विकाराचे रुग्ण मोठय़ा संख्येने आढळत आहेत.

व्हॉल्व तपासला अन् निघून गेले..
पाण्याला दुर्गंधी येत असल्याने सकाळी नगरसेवक शैलेश ढगे यांच्यासह तीन नगरसेवकांकडे फोनवरून तक्रार केल्यानंतर तब्बल सहा तासांनी पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी शिवाजीनगर परिसरात आले. एमएसइबी कॉलनीतील व्हॉल्व तपासला व निघून गेले, मात्र काय झाले याची माहिती दिली नाही. प्रमोद बागुल, रहिवासी


धरणातील तळाचे पाणी
उष्णतेमुळे दिवसा पाणी पातळीत घट होत आहे. दारणा धरणातील पाण्याने तळ गाठला असून, सध्या जलशुद्धीकरण केंद्रात धरणातील तळाचे शेवाळयुक्त पाणी येत आहे. त्याला मांसासारखी दुर्गंधी येत आहे. क्यू कोरिनेशनचा डोस वाढवून दुर्गंधी घालवण्याचा प्रयत्न करणार आहे. दुर्गंधी येत असली तरी पाणी पिण्यास योग्य आहे. आर. एम. ठाकरे, शाखा अभियंता

कोणताही दोष नाही
नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्रातून विभागात शुद्ध पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी तपासणी केली. त्यात दोष आढळला नाही. एम. वाय. मनमाडकर, कनिष्ठ अभियंता, नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्र

शुद्ध पाणी मिळणार
नागरिकांच्या तक्रारीवरून अधिकार्‍यांना जाब विचारला असता त्यांनी कडवा धरणाचे पाणी दुर्गंधीच्या संशयामुळे भरणे थांबवले. गुरुवारी गंगापूरचा पाणीपुरवठा होणार असून ते दुर्गंधीमुक्त असेल. अशोक सातभाई, नगरसेवक

पाणी उकळून प्यावे
उष्णता व दुर्गंधीमुळे पोटाचे व अन्य विकार टाळण्यासाठी नागरिकांनी पाणी उकळून व थंड करून प्यावे. डॉ. अशोक निरगुडे