आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता मोहिमेत नाशिक रोल मॉडेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- स्वच्छता मोहिमेत देशात नाशिक रोल मॉडेल ठरले आहे. जुलैला होणाऱ्या स्वच्छता मोहिमेत सर्व शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसह राजकीय, सामाजिक, व्यावसायिक आणि शासकीय क्षेत्रातील नागरिकांचा समावेश राहणार असून, ही मोहीम वर्ल्ड रेकॉर्ड ठरणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
शहरातील दोन खासगी कार्यक्रमांनिमित्त पालकमंत्री महाजन शनिवारी शहरात आले होते. शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्र्यांनी या मोहिमेबाबत माहिती दिली. नाशिकमध्ये आठवडाभरापूर्वी राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेला सर्वच क्षेत्रातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. सिंहस्थ कुंभमेळा हा ग्राम उत्सव असल्याने सर्व नागरिक या मोहिमेत सहभागी झाले होते. या मोहिमेची खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील दखल घेतली आहे. स्वच्छतेबाबत नाशिककर गंभीर आहेत. या शहराचा आदर्श इतर जिल्ह्यांनी घ्यावा. जुलै रोजी राबविल्या जाणाऱ्या स्वच्छता मोहिमेत सर्व शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. स्वच्छतेबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी शासनस्तरावरूनही नियोजन सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
शहरात सुशोभीकरणाची कामे निधीअभावी रखडली आहेत. कुंभमेळ्यासाठी अतिरिक्त रेल्वेगाड्या वाढविणे शक्य नाही, मात्र संभाव्य गर्दी लक्षात घेता अतिरिक्त डबे जोडण्याचे नियोजन केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत ठरले आहे. सिंहस्थात कामांच्या दर्जाबाबत तडजोड शक्य नाही. कामे निकृष्ट आढळल्यास ठेकेदारांवर कारवाई केली जाणार आहे. कुंभमेळ्यात दूरसंचार विभागाचे नवीन टॉवर्स उभारण्याचे नियोजन सुरू आहे. कालावधी कमी असला तरीही टॉवर उभारण्यात येतील, अशी ग्वाहीदेखील पालकमंत्र्यांनी या वेळी दिली.
कुंभमेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे. पर्वणीच्या वेळी व्हीव्हीआयपींचा दौरा होणार नाही. तसेच, पोलिसांवर अतिरिक्त बंदोबस्ताचा ताण येणार नाही, यासाठीचे नियोजन सुरू आहे. सर्व विभागांमध्ये समन्वय असल्याने सिंहस्थाचे नियोजन पूर्ण झाले आहे. दोन दिवसांत नवीन संपर्क कार्यालयाचे उद््घाटन करण्यात येणार असल्याचेही महाजन यांनी सांगितले. आमदार बाळासाहेब सानप, विक्रांत चांदवडकर, सुरेश अण्णा पाटील, तुषार जगताप यांच्यासह शासकीय अधिकारी या वेळी उपस्थित होते.