आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅलेंटाइन वीकमध्ये काेमेजला लाल गुलाब !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - टवटवीत लाल गुलाबाशिवाय व्हॅलेंटाइन डे तसा फिकाच... प्रेमाचे प्रतीक असलेल्या गुलाबांची नाशकात मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि निर्यात होते. मात्र, यंदा कमी पाऊस अाणि जागतिक मंदीमुळे गुलाबाचे भाव निम्म्याहून अधिक ‘काेमजले’ अाहे. गतवर्षी नाशिक िजल्ह्यातून व्हॅलेंटाइन वीकसाठी सुमारे १० लाख गुलाबांची निर्यात झाली हाेती, यंदा मात्र हा अाकडा सहा लाखांवर येऊन ठेपला अाहे.

जिल्ह्यातील जानाेरी, अांबे अाणि माेहाडी या गावांनी नाशिकची अोळख असलेल्या द्राक्षांऐवजी गुलांबाची शेती फुलवली आहे. द्राक्ष शेतीच्या तुलनेत गुलाब शेतीत फारशी चिंता नसते, असा अाजवरचा समज हाेता. यंदा तो गैरसमज असल्याचे स्पष्ट झाले अाहे. यंदा जिल्ह्यात अतिशय कमी पाऊस झाल्याने गुलाबाचे उत्पादन कमालीचे घटले अाहे. वडनेर दुमाला येथील शेतकरी मधुकर पाेरजे म्हणाले, यंदा लाल गुलाब, विशेषकरून टाॅप सिक्रेट अाणि काेरडी या फुलांना मागणी अाहे. फुलविक्रेता किरण शिंदे यांच्यानुसार, व्हॅलेंटाइन डेला चांगल्या दर्जाचा गुलाब १५ ते २० रुपयांत विकला जाईल. गेल्या वर्षी ताे २५ रुपयांपर्यंत विकला गेला हाेता. सध्या ताे २ ते ३ रुपयांत विकला जात अाहे.

गेल्या वर्षी ३०० रुपये भाव, यंदा केवळ १२० रुपयेच : जानाेरीतील शेतकरी दत्तात्रय घुमरे म्हणाले, गेल्या वर्षी व्हॅलेंटाइन सप्ताहात २८० ते ३०० रुपयांपर्यंत २० फुलांच्या जुडीची विक्री झाली हाेती. यंदा मात्र हा भाव ११० ते १२० रुपयांपर्यंत खाली उतरला अाहे. इतकेच नाही तर जागतिक मंदीमुळे यंदा मुंबईतील ३० टक्के एक्सपाेर्ट व्यापाऱ्यांनी
फुले खरेदी केलेली नाहीत. काेलकाता, चेन्नईतील फर्मचीही अशीच अवस्था अाहे.

गुलाबाचा दिंडाेरी तालुका
{ २५० एकर क्षेत्रावर लागवड
{ एक राेपाला वर्षभरात येतात सहा वेळा फुले
{ गुलाब शेतीतून दरराेज १५०० लाेकांना राेजगार
{ २५० एकूण पाॅलिहाऊसेस...
अशी उलाढाल
{ एरवी गुलाबाची दरराेज विक्री : २० हजार नग
{ व्हॅलेंटाईन वीकमध्ये विक्री : ३० हजार नग