आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik 's Tushar Kasar Treatment Latest News In Marathi

तुषार कासारवर अहमदाबादेत सोमवारी अवघड शस्त्रक्रिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्यभरातील दात्यांनी भरभरून मदत दिल्यामुळे चुंचाळे (जि. नाशिक) येथील रहिवासी तथा मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या तुषार कासार याच्यावर शस्त्रक्रियेचा मार्ग सुकर झाला आहे. पहिल्या टप्प्याची शस्त्रक्रिया शुक्रवारी दुपारी 2 वाजता होणार असून मुख्य शस्त्रक्रिया सोमवारी अहमदाबादेत होणार आहे. ती अकरा तास चालण्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांनी वर्तवली आहे.
जन्मत:च मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रासलेल्या तुषार या सातवर्षीय बालकावरील शस्त्रक्रियेचे आव्हान अहमदाबाद येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ किडनी डिसिज अँड रिसर्च सेंटर’ने स्वीकारले आहे. या शस्त्रक्रियेसाठी 4 लाख 50 हजार रुपयांचा खर्च असल्याने तुषारचे आई-वडील हतबल झाले होते. मात्र दिव्य मराठीने त्यांची वेदना मांडून दात्यांना आवाहन केल्यानंतर दोन आठवड्यांत सुमारे सहा लाख रुपये जमा झाले.
त्यामुळे तुषारच्या पुढील तीनही शस्त्रक्रीयांचा मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवारी दुपारी 2 वाजता किडनी स्टोन काढण्यासाठी अहमदाबाद येथे पहिली शस्त्रक्रीया होणार आहे. त्यानंतर सोमवारी मूत्रपिंडाशी संबंधित मुख्य आणि अवघड शस्त्रक्रीया होणार असल्याचे तुषारचे वडील किरण कासार यांनी कळविले आहे. सध्या हॉस्पिटलमध्ये तुषारच्या सोबत त्याची आई ललिता कासार या आहेत.