आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधुग्रामच्या जागेचा वाद पाेहाेचला पाेलिस ठाण्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - साधुग्रामच्या जागा वाटपाचा तंटा दिवसेंदिवस वाढत चालला अाहे. रविवारी निर्माेही अाखाड्याच्या महंतांनी लक्ष्मीनारायण ट्रस्टची २ एकर जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर दिगंबर अाखाड्याचे महंत श्रीरामस्नेहीदास महाराज यांनी पाेलिस ठाण्यात महंत राजेंद्रदास व अाखाडा परिषदेचे भक्तिचरणदास यांच्याविराेधात तक्रार दाखल केली अाहे.
कुंभमेळ्यातील ध्वजपर्व काही तासांवर अालेले असतानाही शासनाकडून साधुग्रामसाठी माेफत प्लाॅटचे अद्याप वितरण झालेले नाही. प्रशासनाने प्लाॅट वाटपाचे सर्वाधिकार अाखाडा परिषदेला दिले असले, तरी त्यात एकमत हाेत नाही. लक्ष्मीनारायण मंदिराने अातापर्यंत ३० एकर जमीन शासनाला दान केेली अाहे. त्याबराेबरच साधुग्राम उभारण्यासाठी ११ पैकी ९ एकर जमीन तात्पुरत्या स्वरूपात िदली. उर्वरित दाेन एकर जागा साधूंच्या भाेजनासाठी व निवाऱ्यासाठी जागा राखीव ठेवली. या जागेवर मंडप उभारणी सुरू असताना अचानक भक्तिचरणदास व महंत राजेंद्रद्रास यांनी त्यावर अाक्षेप घेतला. हे काम बंद पाडण्याचे धमकावत ही जागा निर्मोही अाखाड्यासाठी देण्यात अाली अाहे, असा दावाही त्यांनी केला. त्यास महंत रामस्नेहीदासजी यांनी िवराेध दर्शवला असता त्यांनाही धमकावण्यात अाल्याचे तक्रार अर्जात म्हटले अाहे. दरम्यान, या वादात संबंधित महंतांशी बाेलून ताेडगा काढला जाईल, असे पाेलिसांनी सांगितले.