आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेपर्वाई: शालिमार कारंजाची बनतेय कचराकुंडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुने नाशिक- शालिमार येथील इंदिरा गांधी चौकातील कारंजाची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. महापालिकेतर्फे कारंजावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. परंतु, ती बंद असून, तसेच कारंजाभोवताली लावण्यात आलेल्या फरशा निघाल्या आहेत. या कारंजाला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. त्याचप्रमाणे लोखंडी कुंपणही चोरीला गेले आहे.
शालिमार चौकात सतत वर्दळ असते. त्याचप्रमाणे या भागात दुकानांची संख्या अधिक असल्याने गर्दीचे प्रमाण जास्त असते. या भागातून नाशिकरोड, भगूर, रेल्वे स्टेशन, शिंदे, पळसे आदी भागात जाणार्‍या नागरिकांची नेहमी गर्दी असते. याठिकाणी रिक्षा, टॅक्सी स्टॅँड होते. मात्र, रिक्षा व टॅक्सी चालक यांच्या रोषाला सामोरे जाऊन नगरसेवकांनी 20 लाख रुपये खर्च करून शालिमार येथे हा कारंजा उभारण्यात आला. मात्र, काही दिवसांपासून महापालिकेने दुर्लक्ष केल्याने कारंजाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. विजेचे रोहित्र उघडे असल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.