नाशिक - शहरीकरणाच्या जमान्यात गावाकडचा पाटलाचा वाडा आणि अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाची लज्जत देत नाशिकच्या खवय्यांना तृप्त करणारे नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेळगाव ढगा शिवारातील हॉटेल संस्कृती अमेरिकेच्या वारीवर चालली आहे. महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या पारंपरिक व दुर्मिळ वस्तुचे प्रदर्शन न्यूय़ॉर्कच्या टाइम स्क्वेअरवर संस्कृतीकडून भरविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून अमेरिकेत ‘ दिवाळी महोत्सव २०१४’ चे आयोजन करण्यात आले आहे. न्यूयॉर्क शहरात १६ ते २१ सप्टेंबरदरम्यान होत असलेल्या या महोत्सवात महाराष्ट्रातील संस्कृतीची ओळख अमेरिकेतील पर्यटकांना व्हावी या दृष्टीने हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून, त्यात राज्यातील केवळ हॉटेल संस्कृतीचीच निवड महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केली आहे.प्रदर्शनाकरता हॉटेलचे संचालक दिग्विजय शिवाजी मानकर उपस्थित रहाणार आहेत.