आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत निवृत्तिनाथांच्या यात्रेचा परतीचा प्रवासही भक्तिमय..

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक: ‘पुंडलीकवरदा हरी विठ्ठल’ असे म्हणत पायी केलेला प्रवास, भक्तीची ती अपार ओढ आणि दर्शन होताच ओघळणारे आनंदार्शू अशा वातावरणात गेले काही दिवस संत निवृत्तिनाथांच्या यात्रेच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर आणि नाशिक परिसर भारावून गेला होता. गुरुवारी एकादशीच्या दिवशी दर्शन सोहळा झाला आणि ग्रामीण भागासह अन्य जिल्ह्यांतूनही आलेल्या दिंड्या परतीच्या प्रवासाला निघाल्या. शुक्रवारी हजारो वारकरी टेम्पो, ट्रॅक्टर, ट्रक मिळेल त्या वाहनाने आपापल्या गावी परतत होते. लहानथोरांपासून महिलांपर्यंत सगळेच दिंडीत सामील झाले होते. देवळा तालुक्यातील चिंचवेणी येथील 200 वारकर्‍यांच्या जथ्थ्याची अवस्थाही ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ अशीच होती. त्यातील काही वारकरी भावना प्रकट करताना भारावून गेले होते.