आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: संस्था अनेक, कारणे अनेक, सर्वांचा उद्देश मात्र एकच; शिष्यवृत्ती हडपणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेतील पुढे आलेला गैरव्यवहार हे हिमनगाचे टोक असल्याचा अंदाज व्यंकटेशम पथकाने  आतापर्यंतच्या दोन अहवालांद्वारे राज्य सरकारला कळविला आहे. पथकाने केलेल्या चौकशीत गैरव्यवहाराची एक विशिष्ट पद्धत निदर्शनास आली आहे. ही मोड्स ऑपरेंडी सर्वच जिल्ह्यातील संस्थांमध्येही वापरली जात असल्याचा संशय पथकाने व्यक्त केला आहे.
 
आतापर्यंत याबाबत जिल्हा किंवा विभागीय स्तरावर अनेक चौकशा, गुन्हे आणि अटकसत्र होऊनही राज्याच्या धोरणात फरक पडलेला नाही. म्हणूनच या राज्यव्यापी षड्यंत्राची जबाबदारी निश्चित करण्यासाठी, शासनाच्या एकूण वसुलीचा शोध घेण्यासाठी सदर पथकाने स्वतंत्र लेखापरीक्षणाची शिफारस केली आहे. तसेच या प्रकारांना आळा घालण्यासाठी शासन स्तरावर महत्त्वाचे धोरणात्मक बदलही सुचविले आहेत. मात्र, संस्थांनी या चौकशीविरोधात न्यायालयात धाव घेतल्याने पथकाचे काम थांबले आहे.

चौकशी पथकाच्या शिफारशी
- वसूलपात्र रक्कम निष्पन्न होण्यासाठी दोषी व्यक्तींवर तत्काळ गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे.  
- अधिक लेखापरीक्षकांच्या माध्यमातून सर्व संस्थांचे सविस्तर  लेखापरीक्षण करणे गरजेचे आहे.  
- भविष्यात हे टाळण्यासाठी एकाच सॉफ्टवेअरमधून शिष्यवृत्ती मंजूर व्हावी.  
- सर्व खात्यांना बांधील सामायिक नियम तयार करावेत .  
- ऑनलाइन हजेरी पत्रक, विद्यार्थ्याचा आधार क्रमांक आणि शिष्यवृत्ती मंजुरी जोडण्यात यावे.  
- आंध्र प्रदेश, तेलंगणाप्रमाणे सर्व महाविद्यालयांना एकच शिक्षण शुल्क असावे.  
- डिजिटल आणि मॅन्युअल अशी तीन पदरी पडताळणी असावी.

पुढील फोटोवर क्लिक करून वाचा,
> जिल्हानिहाय संस्था व शिष्यवृत्तीवाटपात केेलेला गैरव्यवहार
बातम्या आणखी आहेत...