आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- विद्यार्थी वाहतूक करणार्या स्कूलबस, जीप, रिक्षा व इतर वाहनांना प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) सुरक्षिततेसाठीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने 250 वाहनांवर गेल्या वर्षभरात कारवाई करण्यात आली. दहा वाहनांची नोंदणी रद्द करून 30 चालकांचे परवाने निलंबित केले आहेत. 15 जूनपासून सुरू होणार्या शैक्षणिक सत्रातही आरटीओकडून स्वतंत्र पथकाद्वारे कारवाई होणार असून, वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे.
अमरावती जिल्ह्यात विद्यार्थी वाहतूक करणार्या वाहनाला अपघात होऊन निष्पाप विद्यार्थ्यांचा बळी गेला होता, त्यापाठोपाठ नाशकातही गंगापूररोड भागात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या रिक्षाला ट्रकने धडक दिल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यापुर्वी मार्चमध्ये विद्यार्थ्यांच्या बसला झालेल्या अपघातांची दखल घेत शासनाने स्कूलबस, जीपचालकांसाठी स्वतंत्र नियमावलीच तयार केली.
यासाठी आरटीओ व वाहतूक पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी ऑगस्ट ते ऑक्टोंबर या कालावधीत आरटीओकडून स्कूलबस, रिक्षा, व्हॅनचालक आणि संस्थाचालकांची एकत्रित बैठका घेऊन नियमावलीची माहिती देण्यात आली. त्याचबरेाबर या नियमांचे सक्तीने पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, आरटीओकडून शाळा सुरू झाल्यावर स्कूल बसचालकांना विद्यार्थी सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरीही नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित शिक्षण संस्थाचालकांसह वाहनधारकांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला .
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.