आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Shivsena Leader Sudhakar Badgujar Arrested

नाशिक: भाजप मेळाव्यावर हल्ला; शिवसेना नगरसेवक अटकेत, कार्यकर्ते आक्रमक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भाजपच्या महिला मेळाव्यात घुसून ताेडफाेड केल्याप्रकरणी शिवसेना नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना पाेलिसांनी मंगळवारी अटक केली. या प्रकरणात शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांसह तब्बल १०० आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील काहींना अटक करून जामिनावर सुटका करण्यात अाली हाेती.

भाजपच्या नेत्या व राज्य महिला अायाेगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी स्वतंत्र मराठवाड्याबाबत अनुकूल मत व्यक्त केल्यामुळे २२ मार्च रोजी शिवसैनिकांनी नाशिकमधील भाजपच्या महिला मेळाव्यात घुसून गोंधळ घातला होता. त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह तब्बल १०० आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यात दराेड्याचाही गुन्हा दाखल हाेता. महिला आघाडीच्या नेत्या सत्यभामा गाडेकर यांना त्याच दिवशी अटक करून नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली हाेती. मात्र दाेन अाठवड्यांनंतर नगरसेवक बडगुजर यांना अटक करण्यात अाली. हा राडा घडवण्यात बडगुजर यांचा सहभाग असल्याचा पाेलिसांना संशय अाहे.

मेळाव्यानेे प्रत्त्युत्तर
शिवसेना- भाजपमधील दरी नाशकात वाढत चालली अाहे. नुकत्याच झालेल्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत भाजपने शिवसेनाविराेधी रणनिती ठरवली. तर येत्या २४ एप्रिल राेजी नाशकात उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता मेळावा घेऊन भाजपला प्रत्त्युत्तर देण्याची तयारी शिवसेनेने केली अाहे.