आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसर्‍या दिवशीही शटर राहिले डाउन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - एलबीटीविरोधात बेमुदत बंद पुकारलेल्या व्यापार्‍यांनी दुसर्‍या दिवशीही एकजूट दाखवून दिली. मुख्य बाजारपेठेतील बहुतांश दुकाने बंद राहिली. दरम्यान, कॉलेजरोडवर मोटारसायकल रॅली काढून बळजबरीने दुकाने बंद करण्याचा प्रयत्न करणार्‍या 10 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

नाशिक व्यापारी महासंघाच्या नेतृत्वाखाली 33 संघटनांनी बंद पुकारला आहे. दोन दिवसात 200 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. सायंकाळी गंगापूररोडवर मोटारसायकल रॅलीदरम्यान काही उत्साही आंदोलकांनी कॉलेजरोडवरील दुकाने बळजबरीने बंद करण्याचा प्रयत्न केला. गंगापूर पोलिसांनी 10 आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सराफी पेढय़ा उघडल्या : सराफ असोसिएशनने एलबीटीला विरोध व आंदोलनाला पाठिंबा दिला असला तरी शुक्रवारी दुपारपासून पेढय़ा उघडण्यात आल्या. सोमवारी असलेला अक्षय्यतृतीया सण सराफांसाठी महत्वाचा असल्याने असोसिएशनच्या बैठकीत पेढय़ा उघड्या ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

आज रक्तदान शिबिर : एलबीटीचा निषेध करण्यासाठी व्यापारी महासंघातर्फे शनिवारी सकाळी रविवार कारंजा येथील जैन स्थानकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सिडकोतही सकाळी 9 वाजता व्यापार्‍यांची रॅली काढण्यात येणार आहे.