आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिंहस्थ: सापडेना दिशा; चर्चेचीही नाही मनीषा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचवटी- कुंभमेळा दोन वर्षांवर येऊन ठेपला असताना, शाही मार्गासारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील मुद्यावर प्रशासनाला नेमकी दिशा सापडत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, प्रशासनाने स्थानिक नागरिकांची मते जाणून घेण्याचीही तसदी न घेतल्याने या विषयाचे गांभीर्यच संबंधितांना समजलेले नाही का, असा सवाल करण्यात येत आहे.

प्रशासनाने मार्गाच्या परिसरातील रहिवासी, व्यावसायिकांची मते जाणून न घेतल्यास हा प्रश्न जटिल होत जाईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या सिंहस्थात 32 भाविकांचा बळी घेण्यास कारणीभूत ठरलेल्या अरुंद शाहीमार्गातील अडथळे प्रशासन काढणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, रहिवाशांशी चर्चेला सुरुवात नसल्याने व्यवसाय ऐन कुंभमेळ्यात बंद पडतील की काय, या भीतीने स्थानिकांना ग्रासले आहे.

नियोजनाचा अभाव
सिंहस्थाबाबत नियोजनाचा अभाव आहे. प्रशासनाने नागरिकांशी बोलण्यासाठी पुढे यावे. त्यांच्या सूचना लक्षात घ्याव्यात. एकेरी मार्गावरून फक्त साधूंना प्रवेश असावा.
-श्रीराम अय्यर, पुजारी

विश्वासात घ्यावे
शाहीमार्गात अडथळा होणार नाही, यासाठी स्थानिकांची मते प्रशासनाने जाणून घ्यावीत. नोटीस देऊन नागरिकांचा रोष ओढून घेऊ नये.
-गिरीश धुमाळ, नागरिक


एकेरी मार्ग असावा
उपाययोजना करण्यासाठी प्रशासन व्यावसायिकांना हलवण्याच्या तयारीत आहे. शाहीमार्गावर साधूंनाच प्रवेश असावा.
-उमेश जाधव, व्यावसायिक, सरदार चौक

वाढीव जागेसाठी नोटीस
पालिका शाहीमार्गात नवीन परवानगी व घरमालकांना नोटिसा देते. मात्र, जुन्या भाडेकर्‍यांचा विचार करत नाही.
-मनोज कुलकर्णी